खरवली आदिवासी वाडी येथे कातकरी उत्थान अभियान संपन्न
वावेदिवाळी/इंदापुर : गौतम जाधव
महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या सूचनेनुसार माणगांवच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर आणि माणगांव तहसीलदार प्रियांका कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार खरवली आदिवासी वाडी येथे कातकरी उत्थान अभियान राबविण्यात आले. समाजातील मागासलेल्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन हा कार्यक्रम राबविला आहे. यामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाते त्यातून त्या योजनांसाठी पात्र असणारे लाभार्थी शोधले जातात आणि त्यांना त्या योजनांचा लाभ दिला जातो. तसेच आदिवासी बांधवांच स्थलांतर रोखणे त्यासाठी शासनाचा महसुल विभाग सर्वदिप विकास संस्था गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. या अंतर्गत प्रत्येक कातकरी वाडीवर जाऊन सर्वे करण्यात आला व विविध योजनापासू वंचित असलेले लाभार्थी शोधण्यात आले. या कामी संस्थेचे महेश मोरे, काणेकर मॅडम, मोरे मॅडम, या कार्यकर्त्यांची मदत झाली. याअंतर्गत तसेच इंदापूर मंडळाचे मंडळ अधिकारी विश्वास गडदे, तलाठी समीरा खाडे, साले तलाठी ज्योस्तना शिंदे, अमित उजगरे तात्या, विशाल वाघमारे तात्या, इंदापूर विभागातील सर्व तलाठी यावेळी उपस्थित होते तसेच इंदापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. हसन, आदिवासी विकास विभाग पेण येथील निरीक्षक उपस्थित होते. यावेळी खरवली, सुरव, वारक व पेण तर्फे तळे येथील सर्व कातकरी बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमा अंतर्गत कातकरी बांधवाना ७० जातीचे दाखले, १४ उत्पन्नाचे दाखले, १० वयाचे दाखले असे फॉर्म भरण्यात आले आहेत व ३३ लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
Comments
Post a Comment