ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

इजीटेक कंपनीच्या विरोधात १४ मार्चला निलंबीत कामगारांचा आमरण उपोषणचा इशारा

कामगारांच्या पाठीशी राष्ट्रवादी ठामपणे उभी राहणार - बाबुशेठ खानविलकर 

वावेदिवाळी/इंदापूर - गौतम जाधव

विळे-भागाड पोस्को कंपनी अंतर्गत इजीटेक कंपनी व्यवस्थापनाने १७ कामगारांना निलंबित करण्यात आले. या कामगारानी दि. ८ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन कंपनीच्या विरोधात दि. १४ मार्च रोजी कंपनीच्या मुख्य गेटसमोर आमरण उपोषण करणार आहेत.

या कंपनीने ७ ते ८ वर्षांपासून आम्हाला कंपनी अ‍ॅक्ट नुसार बऱ्याच सुविधां पासून वंचित ठेवल्यामुळे सर्व कामगारांनी न्याय हक्कासाठी कंपनीकडे काही मागण्या केल्या होत्या. त्या मागण्या पूर्ण केल्या. परंतु व्यवस्थापनाने काही दिवसांनी सुड भावनेने आम्हाला निलंबित केले. कामगारांचा काही गुन्हा नसताना कंपनीने तडकाफडकी कामावरून निलंबित केले. याबाबत कामगारांनी लेखी विचारणा केली असता त्यांना खोटे दोषारोप पत्र देण्यात आले. या इजीटेक कंपनीने कामगारांना कायमचे घरी बसवायचे षडयंत्र रचले आहे. 

याबाबत कामगार आयुक्त यांच्याकडे तक्रार केली असता तसेच कंपनीला कामगारांना कामावर घेण्याचे आदेश दिले असताना देखील कामगार आयुक्त यांच्या आदेशाला कंपनीने केराची टोपली दाखविली आहे. तसेच विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी सुद्धा कामगारांना कामावर घेण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाला सांगितले परंतु कंपनीने सर्व आदेश धूडकावले आहेत.

यावेळी कामगार सुबोध ठाकुर, रूपेश जाधव, सुनील शिंदे, परेश जंगम, प्रशांत दिवेकर, भावेश जधव,जगदिश पाशीलकर,विशाल हर्णे, एकनाथ जांबरे, विवेक शिंदे ,केतन भोसले, प्रणित महामुनकर, निखिल पोलेकर ,प्रणाल नलावडे, राहुल जोशी, यांनी सांगितले की आमची चूल विजली आहे तिला आग द्यायची आहे. आमच्यावर उपसमारीची वेळ आली असुन या कंपनीच्या विरोधात आम्ही १४ मार्च २०२२ रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले.

याबाबत महाड- पोलादपुर माणगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष चंद्रशेखर उर्फ (बाबूशेठ) खानविलकर यांनी पत्रकारांजवळ संवाद साधला असता त्यांनी बोलताना सांगितले की, सर्व पक्षीय लोकांनी या १७ कामगारांना पाठिंबा देऊन हे कामावर रुजू झाले पाहिजे या करीता प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याच चूका या कंपनीच्या सुद्धा आहेत. या कामगार मुलांच्या सोबत मी व माझा राष्ट्रवादी पक्ष नेहमीच ठामपाणे उभा असणार असून या १७ मुलांना माणगांव मधील सर्वच राजकीय व सामाजिक संघटनाच्या कार्यकत्यांने तसेच पुढाऱ्यांने आपले आप आपसातले मतभेद विसरून या कामगारांच्या पाठीशी उभे राहिले तर स्थानिक भूमी पुत्रांना नक्कीच न्याय मिळेल. तसेच या कंपनीच्या व्यवस्थापनेला देखील आपण विरोध केला नाहीतर आपल्या स्थानिक मुलांना ही कंपनी अशी सतत डावलत राहील त्यांना कामावरून काढून टाकेल  त्यामुळे सर्व पक्षीय लोकांनी या कामगारांना पाठींबा द्यावा देणे गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog