शुभम जयस्वाल गोळीबार प्रकरणात आरोपी यांना अटक झाल्याने कोकण उत्तर भारतीय एकता मंच यांनी केले पोलीसांचे अभिनंदन - डॉ. नरेंद्र सिंह
वावेदिवाळी/इंदापूर : गौतम जाधव
माणगांव येथील सोनी मेडिकलचे मालक ग्यानचंद जयस्वाल यांचा मुलगा शुभम जयस्वाल याच्यावर १२ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री १२ वाजता माणगांव कचेरी रोडवर काही अज्ञात व्यक्तीने गोळीबार करून रात्रीचे पलायन केले होते. ही बातमी जिल्हातिल तसेच माणगांव पोलीसांना समजताच त्या ठिकाणी ताबडतोब पोहचले व शुभम याला मुंबई येथे सैफ्ही हॉस्पिटल मध्ये दाखल केले.
पोलिसांना आरोपी यांना शोधण्यासाठी अनेक पथक तयार करून शोध घेऊ लागले. तसेच ही घटना झाल्यावर कोकण उत्तर भारतीय एकता मंच माणगांव या संघटनेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र सिंह तसेच योंगेंद्र विश्वकर्मा, चंदूलाल गुप्ता, शिवचरण चौधरी यांनी या घटनेचा निषेध केला व या संघटनेच्या माध्यमातून आरोपीना लवकराच लवकर पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन माणगांव पोलीसांना देण्यातआले. निवेदन देताना माणगांव नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले हे देखील उपस्थित होते.
माणगांव पोलीस हे अँक्शन मोड मध्ये येऊन या आरोपीचा त्यानी महिनाभर शोध चालूच ठेवला होता. आरोपी सापडत नसल्याने पोलिसांना देखील यावेळी खूप मेहनत घ्यावी लागली.परंतु काही दिवसांने आरोपी यांनी शुभम याच्या वडिलांना फोन करून दोन कोटी रुपये दे नाहीतर सम्पूर्ण कुटुंब संपवून टाकू अशी धमकी दिल्याने. पोलिसांना या आरोपी पर्यंत पोहचता आले. पोलीसांना सापळा रचून आरोपीना पकडण्यात यश आले त्यामुळे कोकण उत्तर भारतीय एकता मंच संघटने कडून रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक, स्थानिक गृन्हे अन्वेषन शाखा आलिबाग तसेच माणगांव उपविभागीय पोलीस अधिकारी, माणगांव पोलीस निरिक्षक, तसेच माणगांव पोलीस कर्मचारी यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीचे कौतुक करून त्यांचे आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment