मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨

साई राजिप शाळेत डिजिटल रूमचे उद्घाटन

साई/माणगांव : हरेश मोरे

माणगांव तालुक्यातील साई येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत 27 एप्रिल रोजी साई ग्रामपंचायतीचे सरपंच हुसेन राहटविलकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण, शिक्षक योगेश गुगले, उपसरपंच रेश्मा राजेंद्र अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य निगार जुवले, महमद हनीफ खेरटकर, प्रकाश धुमाळ, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तेटगुरे तसेच  शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष प्रविण अधिकारी, सदस्य विठोबा मोरे, सुकेशनी जाधव, नरेश अधिकारी, मंगेश ठाकूर उर्मिला अधिकारी, अश्विनी भोईणे, मंजुळा अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी साई ग्रामपंचायत सरपंच मार्गदर्शन करताना सांगितले की, या शाळेत यापूर्वी शिक्षण घेतलेले विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक तसेच विविध ठिकाणी अधिकारी म्हणून काम करीत आहेत. आताचे युग हे डिजिटल आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर स्पर्धा परीक्षा मध्ये सहभागी होणे गरजेचं आहे.

Comments

Popular posts from this blog