प्राणीमित्र कुमार देशपांडे यांनी गायीला दिले जीवनदान!
सर्प पशू पक्षी जीवनदान संघटनेची कौतुकास्पद कामगिरी
रोहा : अक्षय जाधव
रोहा तालुक्यात दमखाडी येथे गाय विहिरीत पडलेल्या अवस्थेत होती. तेथील आजूबाजच्या नागरिकांनी तातडीने पशु पक्षी संघटनेला कळवले त्यानंतर त्वरित पशु पक्षी संघटनेच अध्यक्ष कुमार देशपांडे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. प्राणीमित्रांनी पाऊण तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी गायीला सुखरूप बाहेर काढले. या कामाबद्दल पशु पक्षी संघटनेचे सर्व स्तरांतून कौतुक केल जात आहे. यावेळी अनिकेत पाडसे, सोहम जाधव, दिनेश शिर्के, स्वप्नील काफरे इत्यादी सदस्य उपस्थित होते
अशा प्रकारे कोणताही मुका जनावर जखमी अवस्थेत आढळा तर त्वरित पशु पक्षी संघटनेला कळवावे.
- अनिकेत पाडसे, सदस्य : पशुपक्षी जीवनदान संघटना

Comments
Post a Comment