जिल्ह्यातील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा : रायगड मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीसांना निवेदन
रोहे : अमोल पेणकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात ३ मे पर्यंत राज्यातील मशिदी,मदरश्यांवर असलेले अनधिकृत भोंगे उतरावेत अशी डेडलाईन राज्य शासनाला दिली होती. त्या अनुषंगाने रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क प्रमुख दिलीप सांगळे यांचे नेतृत्वाखाली दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक रायगड यांना निवेदन दिले आहे.बुधवार २७ एप्रिल रोजी दिलेल्या या निवेदनात जिल्ह्यातील मशिदी व मदरश्यांवर अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी जिल्हा सचिव अमोल पेणकर,रोहा तालुकाध्यक्ष अक्षय रटाटे म्हसळा तालुकाध्यक्ष स्वप्नील करडे रोहा तालुका सचिव साईनाथ धुळे, आदिंसह जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
२००५ साली मुंबई उच्च न्यायालय यासह पश्चिम बंगाल व कर्नाटक मधील न्यायलयाने ध्वनिप्रदूषण करणारे सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांवरील भोंगे उतरावेत असे आदेश दिले होते. यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात ३ मे पर्यंत राज्यातील सर्व अनधिकृत भोंगे उतवरण्या संदर्भात राज्य शासनाला अल्टिमेटम दिले होते.या भोंग्यांच्या मुळे सर्व धर्मीय नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.राज्यातील शासन या निर्णयाची आजपर्यंत अमलबजावणी करत नसल्यामुळे अखेर राज ठाकरे यांनी यावर कारवाई करण्यासाठी मुस्लिम समजाचा पवित्र रमजान महिना संपत ईद साजरी झाल्यानंतर यावर कारवाई करावी अशा प्रकारचे अल्टिमेटम दिले होते. त्या अनुषंगाने रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना जिल्ह्यातील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्या संबंधित निवेदन दिले आहे.

Comments
Post a Comment