मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

रायगड प्रेस क्लबचा वर्धापन दिन २२ एप्रिल रोजी माणगांवात, मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कारांचे वितरण

वावेदिवाळी/इंदापुर : गौतम जाधव

रायगड प्रेस क्लबचा १६ वा वर्धापन दिन आणि पत्रकार सन्मान सोहळा माणगांव येथे कुणबी भवन या ठिकाणी २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम रायगड प्रेस क्लबचे संस्थापक तसेच मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न  होणार आहे. या सोहळ्यात राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्कार आणि जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

या रायगड प्रेस क्लबचे पुरस्कारांचे मानकरी अजित वरपे यांना आचार्य अत्रे राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्कार, विजय मांडे  जीवन गौरव पुरस्कार, मेघराज जाधव व उदयकुमार कळस स्व. निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी जेष्ठ पत्रकार पुरस्कार,प्रफुल्ल पवार स्व.प्रकाश काटदरे स्मृती निर्भीड पत्रकार पुरस्कार,संजय (आपा) ढवळे व चंद्रशेखर (बाबुशेठ) खानविलकर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, डॉ. इस्माईल रहाटविलकर आरोग्यसेवा पुरस्कार, संतोष वरपे, दीपक जाधव, डॉ. संजय सोनवणे यांना यशस्वी मराठी उद्योजक पुरस्कार, हरेश मोरे स्व. संतोष पवार स्मृती युवा पत्रकार पुरस्कार, सीमा मोरे सावित्रीबाई फुले महिला पत्रकारिता पुरस्कार, प्रकाश माळी व प्रसाद पाटील उत्कृष्ट छाया चित्रकार पुरस्कार, आनंद पवार, एस. टी. पाटील, संतोष शिलकर, नंदकुमार मरवडे यांना श्रमिक पुरस्कार देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी ना.आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, मा.प्रवीण दरेकर, ज्येष्ठ माध्यमकर्मी समीरण वाळवेकर, आमदार भरत गोगावले, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, मराठी पत्रकार परिषद विश्वस्त किरण नाईक, मराठी पत्रकार परिषद कार्याध्यक्ष शरद पाबळे, परिषदेचे माजी कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कोकण विभाग मराठी पत्रकार परिषद सचिव विजय मोकल, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष भारत रांजणकर,जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यावेळी  उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रायगड प्रेस क्लब जिल्हा कार्यकारिणी व माणगांव तालुका प्रेस क्लब कार्यकारिणी मेहनत घेत आहेत.

Comments