सर्वच क्षेत्रात पुढे जाणारे गाव म्हणजे देवकान्हे : खा. सुनील तटकरे
रोहा : रविंद्र कान्हेकर
देवकान्हे गाव हे लोकसंख्येनी मोठं गाव आहे. या गावाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. दारुकांड, कबड्डी खेळून येताना खेळाडूंचा झालेला अपघात यामध्ये अनेक लोकांना जीव गमवावा लागला. वाढती लोकसंख्या पाहता गावाचा विस्तार वाढत आहे. कुटुंब संख्या वाढीमुळे घरे अपुरी पडू लागली. पूर्वेला कालव्याची तटबंदी तर पश्चिमेला डोंगर असल्याने घरांचा विस्तार करणे कठीण होऊन बसले आहे. यासंदर्भात मी स्वतः पाटबंधारे खात्याकडे बोलून सायपन व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हणाले. कबड्डी, क्रिकेट, दहीहंडी स्पर्धेत सात थर लावण्याची कसब, तसेच शिक्षण क्षेत्रात इंजिनियर, शिक्षक, बीएस्सी, एम एस सी उच्च शिक्षण घेत सर्वच क्षेत्रात देवकान्हे गाव पुढे जात आहे. असे विधान खा. सुनील तटकरे यांनी केले. देवकान्हे गावातील विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, तालुका अध्यक्ष विनोदभाऊ पाशीलकर, गोवे सरपंच महेंद्र पोटफोडे, सरपंच वसंत भोईर, ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण धनवी, माजी उपसभापती बाळकृष्ण बामणे, विभागीय अध्यक्ष रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, घनश्याम कराळे, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर भोईर, माजी सदस्य संतोष कोंडे, मनोज शिर्के, नरेंद्र जाधव, नरेंद्र पवार, माजी सरपंच मंगेश भोईर, पोलीस पाटील दयाराम भोईर यांसह ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे बोलताना खा. सुनील तटकरे म्हणाले कि, खांब पालदाड रस्ता, पुलावरील रस्ता, नवीन पुलाचे लोकार्पण, राज्यसरकाराच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील निडी ते खांब हा रस्ता राज्य मार्ग नसल्याने या रस्त्यासाठी जमीन भूसंपादन करता येत नसताना काही शेतकऱ्यांनी जमिनी दिल्याने रस्त्याचे काम झाले. आता देवकान्हे ते धानकान्हे दरम्यानचा हा रस्ता मंजूर आहे, पैसे उपलब्ध आहेत मात्र आता शेतकऱ्यांनी मोठ्या मनाने जमिनी उपलब्ध करून वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढे यावे. जेणेकरून येथील शेतकऱ्याच्या कामाला गती येईल. देवकान्हे
आदिवासी वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम याच वर्षी पूर्ण होणार असल्याची खात्री खा. सुनील तटकरे यांनी दिली. गावाच्या विकासाच्या कामात पक्षीय राजकारण दूर ठेवा. मी स्वतः दिलेल्या निधीतून गावदेवी मंदीर, श्री हनुमान मंदीर आणि आता महादेव मंदीर ही कामे पूर्णत्वास नेत असताना मी पक्ष बघितला नाही, गावातील सर्व लोक माझे आहेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे. गोविंदा पाथकामध्ये गावातील सर्व आळ्यांची मुले एकत्र येऊन थर रचतात. त्यामुले गावात एकीचे बळ दिसले. या गावात एकोपा असल्याने व शिक्षण क्षेत्रात पुढे येत असल्यानेच या भागातील तरुणाई परदेशात आपले नाव करत आहेत.
गावाचा सर्वांगीण विकास हा महत्वाचा आहे. देवकान्हे गावातील अंगणवाडी नवीन इमारतीचे उद्घाटन, नवीन नळपाणी योजनेचे भूमिपूजन, शंकर मंदिराचे भूमिपूजन, ग्रामीण रुग्णालय सबसेंटरचे भूमिपूजन करण्यात आले. गावासमोर असलेल्या काळव्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याने लवकरच पाटबंधारे विभागाशी चर्चा करून लवकरच प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन खा. सुनिल तटकरे यांनी दिले.

Comments
Post a Comment