ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

सोलमवाडी एक स्वप्नातील गाव घोषित! 

तहसीलदार ए. एम. कनशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

तळा : कृष्णा भोसले 

तळा तालुक्यातील एक छोटेस गाव सोलमवाडी हे गाव स्वदेस फाऊंडेशन च्या माध्यमातून विविध योजना राबवित तळा तहसीलदार ए. एम. कनशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

यावेळी व्यासपीठावर तहसीलदार ए. एम. कनशेट्टी, गटविकास अधिकारी कुलदीप डोंगर, उपविभागीय कृषी अधिकारी, तळा कृषी अधिकारी आनंद कांबळे, उपसरपंच रवींद्र मांडवकर, स्वदेसचे तुषार इनामदार, महाव्यवस्थापक प्रसाद पाटील, स्वदेसची टीम, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष तुकाराम पाटेकर, युवकअध्यक्ष देवानंद बांद्रे, समिती सदस्य, कार्यकारी मंडळ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मुबंई अध्यक्ष देवानंद बांद्रे यांनी प्रास्ताविक मध्ये आपण गावात शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रोजगार अशा वेगवेगळ्या सात समिती व्दारे या गावात स्वदेस च्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबविल्या.यासाठी ग्रामस्थ,नागरीक बंधु भगिनी,युवक, युवक मंडळ, महिला मंडळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. म्हणूनच आज आम्ही या पारितोषिकाला पात्र ठरलो आहोत असे त्यांनी आवर्जून सांगितले. गावकऱ्यांनी या मध्ये उस्फूर्त सहभाग घेतला.तळा तहसीलदार यांचे हस्ते फित कापुन त्यानंतर ड्रीम व्हिलेज या फलकाचे अनावरण करण्यात आले..वाजत गाजत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे शाल, श्री फळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली. 

तहसीलदार यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. गाव समिती तुकाराम पाटेकर, राजेश सोलम,केशव सोलम, अजय गावडे, काशीराम सोलम, हिराजी सोलम, गणेश बांद्रे, हिरव्या पाटेकर, बाळकृष्ण बांद्रे, तर युवक अध्यक्ष देविदास बांद्रे, विजय सोलम, शंकर बांद्रे, गोविंद बांद्रे, सुदेश बांद्रे, योगेश नेमाने, महीला मंडळ राजश्री सोलम, किर्ती सोलम, भाग्यश्री नेमाने यांसारख्या अनेक कार्यकत्यानीं अतिशय मेहनत घेतली.  

Comments

Popular posts from this blog