मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

कोलाड विभागात आमदार रविशेठ पाटील यांनी विविध सार्वजनिक गणेशोत्सवाला दिली भेट 

रोहा : प्रतिनिधी 

पेण-रोहा-सुधागडचे कर्तव्यदक्ष आमदार रविशेठ पाटील यांनी कोलाड विभागातील देवकान्हे, खांब, पुई, आंबेवाडी, कोलाड येथील सार्वजनिक गणेशोत्सवाला भेटी दिल्या. 

देवकान्हे, खांब, पुई व आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे विशेष कौतुक आमदार साहेबांनी केले. तसेच राज्य शासनाने निर्बंधमुक्त गणेशोत्सव केल्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानले. 

याप्रसंगी आमदार रविशेठ पाटील यांच्या समवेत भाजप ज्येष्ठ नेते मारूती देवरे, तानाजीशेठ देशमुख, विष्णू मोरे, बबलूशेठ सय्यद युवानेते महेशदादा ठाकूर, रविंद्रशेठ तारू तसेच आंबेवाडी, कोलाड, पुई, खांब, देवकान्हे येथील गणेशोत्सव मंडळांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog