मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨

निःस्वार्थीपणे प्राण्यांची सेवा करणारे प्राणीमित्र कुमार देशपांडे!

खारगांव/रोहा : सतिश पाटील

रोहा रायगड मधील समाजसेवक प्राणी मित्र म्हटल्यावर आपल्या सगळ्यांच्या ओठावर नाव येते ते म्हणजे श्री. कुमार देशपांडे! अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, तसेच  अगदी मोफत, कुणाकडूनही कसलीच अपेक्षा न करता नेहमीच एखाद्या मुक्या प्राण्याचं जीव कसा वाचेल त्यासाठी स्वतः जीव धोक्यात टाकून जिथे असेल तिथे आपला किंमती वेळ खर्च करून हजर होतात. तसंच झालं ग्रुप ग्रामपंच्यात खारगांव गावा मध्ये, तिथे एका भटक्या कुत्र्याच्या मानेला इजा झाली होती, संपूर्ण गावा मध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. खारगांव गावचे ग्रामस्थ अनिकेत मळेकर यांनी प्राणी मित्र समाजसेवक श्री. कुमार देशपांडे सर यांना फोन करून कल्पना दिली. क्षणाचाही विलंब न करता कुमार काका खारगांवमध्ये पोहचले आणि त्या कुत्र्यावर ईलाज केला. तसेच गावातले ग्रामस्थ श्री. घनश्याम मळेकर, आशिष घाडगे, दत्ता वाघमारे, चेतन मळेकर, संग्राम कारभारी, प्रवीण गायकर यांनी काकांना मदत केली व कुमार देशपांडे काका यांचे ग्रामस्थ मंडळ खारगांव यांच्या तर्फे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog