मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨

कोल्ड्रिंक्स घेऊन जात असलेल्या टाटा ट्रकचा अपघात 

श्रीवर्धन : संतोष मांजरेकर

सकाळी १०:३० च्या सुमारास मुरुड तालुक्यातील नाकशेत गारंभी गावच्या हद्दीत सर्व प्रकारचे कोल्ड्रिंक्स घेऊन मुरुड कडे येणाऱ्या ट्रेकचा अपघात झाला. सदर अपघात हा ट्रक चालक अवघड वळण घेत असताना ब्रेक फेल झाल्याने घडला. 

या अपघातात ट्रकमध्ये असलेल्या मिक्सिंग कोल्ड्रिंक्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना बाजूच्या गावातील चंद्रकांत वरक् यांनी पाहिली असता पलटी झालेल्या ट्रक जवळ जाऊन ट्रक चालक पिंटू चव्हाण या व्यक्तीला ट्रक बाहेर काढले. तसेच या रस्त्याचे वळण धोकादायक असून या वळणावर् दिवसेंदिवस अपघात घडतच असतात, असे येथील आजूबाजूच्या धनगरवाडी, नाकशेत, पारंभी व शीग्रे या गावातील् लोकांचे म्हणणे आहे व या रस्त्याचे रुंदीकरण लवकरात लवकर झाले पाहिजे अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

Comments

Popular posts from this blog