मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

वडवली येथे भाजीमळा जाळून केला खाक, प्रचंड नुकसान!

वडवली/श्रीवर्धन : संतोष मांजरेकर 

भाजीचा मळा जाळून नासधूस करण्यात आल्याची घटना श्रीवर्धन तालुक्यातील वडवली येथे घडली आहे.

वडवली पुलाजवलील भाजीमळा असलेले स्वतः मालक श्री  दतात्र्यय नथुराम नाकती हे दुपारी जेवण करण्यासाठी घरी गेले असता भाजीमळा असलेल्या जागेमध्ये एका अनोळखी इसमाने आग पेटऊन तेथून पळ काढला. या आगीमुळे भाजीचा मळा जळून खाक झाला व प्रचंड नुकसान झाले. या लागलेल्या आगीमधे भाजीमळ्यातील पाणी मोटर, मोटर पाइप यांसह भाजीमळ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog