मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

इंडीयन रेस्कू अकॅडमीने केली 250 ग्रामस्थांची सुटका 

रायगड (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

अनेक घरे पडली, रस्ते खचले, दरड कोसळली, काही नागरीक पुराच्या पाण्यात अडकून पडले अशा नागरीकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे काम एन डी आर एफ, एस डी आर एफ, यांच्या सह इंडीयन रेस्कू अकॅडमी सारख्या संघटना पुढें सरसावल्या आहेत. 

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांचे जीव वाचवत आहे त, पेण तालुक्यातील तांबडशेत हे खाडी लागत असणारे गाव पुराच्या पाण्याने वेढले होते. अचानक पाणी वाढल्याने गावा बाहेर पडणे कठीण झाले. 

ग्रामस्थ जीव मुठीत धरून मदतीची वाट पाहत असताना इंडीयन रेस्कू अकॅडमीच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत सर्वांना सुरक्षित ठिकाणीं हलवले , पाण्यात अडकलेल्यांची सुखरूप सुटका केली.  

कोलाड येथे असणाऱ्या इंडीयन रेस्कू अकॅडमी मध्ये एन डी आर एफ, आणि एस डी आर एफ, मधिल पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येते. 

तांबडशेत येथील ग्रामस्थांना सुखरूप पणे बाहेर काढण्याचे काम स्थानिक प्रशासन आणि इंडीयन रेस्कु अकॅडमी च्या स्वप्नील डोईफोडे, अमोल जाधव, सम्राट लाड, देविदास पाटील यांनी 250 नागरीकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे काम केले.

यशस्वीरित्या नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका केल्याने इंडीयन रेस्कु अकॅडमी चे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


Comments

Popular posts from this blog