खाद्यतेलाच्या नावाखाली डिझेल तस्करी करणाऱ्या आंतरराज्य माफियाचा पर्दाफाश! ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ४६.५ लाखांच्या मुद्देमालासह 'राजू पंडित' टोळीचे धागेदोरे उघड ठाणे, दि. ३१ (प्रतिनिधी) :- मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ ठाणे शहर गुन्हे शाखा घटक-१ आणि शिधावाटप विभागाच्या संयुक्त पथकाने एक मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. खाद्यतेलाच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारा एक मोठा टँकर या पथकाने जप्त केला असून, या कारवाईत तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. लोकांना फसवण्यासाठी संबंधित टँकरवर 'ईडीबल ऑईल' असे लिहिण्यात आले होते. गुन्हे शाखा घटक-१ ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खारेगाव टोलनाक्याच्या अगोदर, मुंब्रा वळण रस्त्याजवळ सापळा रचून संशयास्पद टाटा कंपनीचा टँकर क्रमांक MH-46-BB-7134 थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील द्रव पदार्थ आढळून आला. टँकर चालकाकडे या डिझेल सदृश पदार्थाची वाहतूक करण्याचा कोणताही परवाना, खरेदी बिल किंवा वैध कागदपत्रे नव्हती. प्रकरणा...
मुख्य संपादक : किशोर केणी |
सहसंपादक : दिनेश चांगू मोरे |
सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
आदर्श शिक्षक हेमंत सारदल यांची चेअरमन पदावर बिनविरोध निवड महाड (स्मरणिका साळुंखे) :- महाड तालुक्यातील अप्पर तुडील शाळेचे मुख्याध्यापक हेमंत सारदल यांची महाड तालुका शिक्षक पतपेढीच्या चेअरमन पदावर बिनविरोध निवड झाली. याबद्दल माजी चेअरमन संजय कोंडविलकर, तालुका अध्यक्ष सचिन खोपडे, वसंत दासगावकर, नवनाथ पवार, विजय जाधव देठे, शिक्षक नेते भिकाजीराव मांढरे, संजेश साळुंखे, समीर होडबे, वसंत साळुंखे यांनी भेटून अभिनंदन केले. सर्व शिक्षकांना सोबत घेऊन पतपेढीचा आलेख उंचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवीन असे उदगार हेमंत सारदल सर यांनी काढले.


Comments
Post a Comment