ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे आयोजित क्रीडा महोत्सव समारोप आणि बक्षीस वितरणास पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती

माणगांव : प्रमोद जाधव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे आयोजित महाराष्ट्र अंतर विद्यापीठ रोप्य महोत्सवी क्रीडा महोत्सव समारोप आणि बक्षीस वितरणास ना. उदय सामंत मंत्री तथा महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रायगड जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच  प्रवक्ते अतुल लोंढे काँग्रेस, माननीय आमदार  भरतशेठ गोगावले,  कुलगुरू डॉ कारभारी काळे ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, विशेष अतिथी सुप्रिया गाढवे, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार प्राप्त महिला भारतीय खो खो संघाची कर्णधार, प्रा, डॉ. अरविंद किवळेकर कुलसचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे क्रीडा समन्वय डॉ. शिवाजी कराड, प्रमोद घोसाळकर, अ‍ॅड. राजीव साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बक्षीसांचे वितरण करण्यात आले. २५ व्या रौप्य क्रीडा महोत्सव क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी खो-खो फुटबॉल आणि बुद्धिबळ या २५ विद्यापीठांमधून अंतिम निकाल जाहीर करण्यात आला प्रथम यावेळी कबड्डी स्पर्धेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर प्रथम क्रमांक महिला संघ मुंबई विद्यापीठ द्वितीय क्रमांक पुरुष कोल्हापूर विद्यापीठ द्वितीय क्रमांक महिला संघ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तृतीय क्रमांक पुरुष मुंबई विद्यापीठ तृतीय क्रमांक महिला संघ एस एन डी टी मुंबई विद्यापीठ, खो-खो या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पुरुष सावित्रीबाई फुले पुणे ,विद्यापीठ प्रथम क्रमांक महिला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर द्वितीय क्रमांक खो खो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, द्वितीय क्रमांक महिला संघ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तृतीय क्रमांक पुरुष खो खो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड याचप्रमाणे फुटबॉल या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पुरुष शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, प्रथम क्रमांक महिला संघ मुंबई विद्यापीठ द्वितीय क्रमांक पुरुष महिला संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, तृतीय क्रमांक पुरुष मुंबई विद्यापीठ द्वितीय क्रमांक महिला संघ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, आणि चौथा खेळ बुद्धिबळ या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पुरुष संघ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, प्रथम क्रमांक महिला संघ मुंबई विद्यापीठ, द्वितीय क्रमांक सात पुरुष संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती , तृतीय क्रमांक महिला संघ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,तृतीय क्रमांक पुरुष मुंबई विद्यापीठ द्वितीय क्रमांक महिला संघ तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, याचबरोबर सांघिक गटामध्ये विजेता गट महिला संघ मुंबई विद्यापीठ ठरला असून आणि पुरुष गटांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ठरलेला आहे. खेळ हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. खेळामुळे एकता आणि सहकार्याची भावना विकसित होते. खिलाडू वृत्ती जोपसल्यास कुठल्याही संकटाचा सामना करता येतो, जीवनात यशस्वीतेसाठी खिलाडूवृत्ती महत्वाची असल्याचे  प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.   

      रौप्य महोत्सवी क्रीडा स्पर्धेत विशेष प्राविण्य आणि नैपुण्य प्राप्त सर्व विजेत्या संघांचे अभिनंदन करुन पालकमंत्री उदय  सामंत म्हणाले की, आपले शरीर ही आपली संपत्ती आहे. क्रीडा महोत्सव हे केवळ बक्षिस मिळविण्यासाठी नसून या माध्यमातून आपले शरीर आणि मन बळकट होत असते. प्रत्येकाने आपले आरोग्य टिकविण्यासाठी खेळाचा आपल्या जीवनात समावेश करणे आवश्यक आहे. खेळामुळे सकारात्मक वृत्तीबरोबरच नम्रता येते. खिळाडूवृत्तीमुळे पराभव पचविण्याची ताकद सर्वांमध्ये वाढीस लागते. यामुळे माणूस जीवनात कधीही पराजित होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी अंगीकारुन स्वत:चे निरोगी आयुष्य घडवावे असेही पालकमंत्री नाम.उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

               या बक्षीस वितरण समारंभामध्ये कुलगुरू डॉ. कारभारी काळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांमध्ये क्रीडा महोत्सव अतिशय व्यवस्थित रित्या पार पडल्यामुळे सर्व खेळाडू, कोच, व्यवस्थापकांचे आभार मानले तसेच राज्यपाल नियुक्त अध्यक्ष व सदस्य, सर्व क्रीडा कमिटीचे सर्व समन्वयक व विद्यापीठातील विभाग प्रमुख तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, एन सी सी, एन एस एस आणि आरोग्य विभाग यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. यानंतर मुख्य क्रीडा समन्वयक डॉ.शिवाजी कराड यांनी सर्व क्रीडा टीम ,श्री काळसेकर, प्रा. पुलचलवाड आणि सर्व क्रीडा टीम यांचे सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली.

       प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी प्रतिस्पर्धी आवश्यक असतो. प्रतिस्पर्ध्याला दाद देण्याची कौतुक करण्यची खिलाडू वृत्ती आपल्यामध्ये आहे. कारण, ही आपल्या राज्याची संस्कृती आहे. महाराष्ट्राला खेळ आणि खेळाडूंची परंपरा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यात सकारात्मकता अंगी बाळगून स्वत:ची प्रगती करावी. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सदैव विद्यार्थ्यांसोबत असल्याची ग्वाही पालकमंत्री नाम. सामंत यांनी यावेळी दिली. यावेळी पालकमंत्री ना. उदय सामंत व उपस्थितांच्याहस्ते विजयी संघ, खेळाडू यांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog