ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

पनवेल, नवी मुंबईतील सोशल क्लब च्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदा जुगार क्लबला पोलीस ठोकतात सलाम? 

डिपार्टमेंटचा पगार कमी पडत असल्यामुळे हफ्ता घेण्याची नामुष्की - अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर

पनवेल (प्रतिनिधी) :- सोशल क्लब च्या नावाखाली पनवेल सुकापूर येथील राज क्लब, पनवेल येथील कपल क्लब आणि कामोठे येथील विनम्र क्लब येथे बेकायदा जुगाराचा धंदा हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनून राहिलेला असून येथे बेकायदा जुगार क्लब का सुरू आहेत? कारण पोलीसांनी दरमहा हफ्ता घेऊन ते क्लब सुरू ठेवलेत आणि पोलीस हफ्ता का घेतात? याचे कारण म्हणजे त्यांना डिपार्टमेंटकडून मिळणारा पगार कमी पडत असेल म्हणून त्यांच्यावर हफ्ता घेण्याची नामुश्की आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येथील पोलीस हे जुगार क्लबवाल्यांना सलाम ठोकत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

येथे 3 पत्ती, 13 पत्ती पॉईंट रम्मी, 21 पत्ती पॉईंट रम्मी, 27 पत्ती पॉईंट रम्मी हे जुगाराचे गेम खेळले जात असून येथे 10 रू, 20 रू, 50 रू, 100 रू, 200 रू, 500 रू. अशा पॉईंटने जुगार खेळला जात आहे. येथील जुगाराच्या व्यसनाने अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले असून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी या बेकायदा प्रकारांना पाठबळ दिल्याचे स्पष्ट होत चालले आहे. 

मा. मुख्यमंत्री, मा. गृहमंत्री, मा. पोलीस महासंचालक यांच्याकडे वारंवार तक्रारी दाखल होऊनही याप्रकरणी कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे यामध्ये खूप मोठी "सेटींग" असल्याचे स्पष्ट होत चालले आहे. या बेकायदा जुगाराच्या धंद्यांना पायबंद कोण घालणार? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. परिणामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांनी याप्रकरणी विशेष पथक तयार करून हे बेकायदा जुगार क्लब कायमचे बंद करावेत अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog