द. ग. तटकरे विद्यालयाचा दहावीचा निकाल ९५%
रोहा (सदानंद तांडेल) :
द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड येथे शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० या वर्षात झालेल्या एस.एस.सी. परिक्षेचा निकाल ९५% लागलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोलाड विद्यालयाने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
विद्यालयाचे प्राचर्य शिरीष येरूणकर, उपप्राचार्य सुखदेव तिरमळे यांच्या कारकिर्दीतील प्रथमच झालेल्या १० वी /१२ वीच्या परीक्षेत विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात उज्वल यश संपादन केले आहे. इयत्ता दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून प्रथम सेजल उमेश बिरगावले : ९१.२०%, द्वितीय समृद्धी समीर सानप : ९०.८०%, तृतीय यश राजेश साळी : ९०.२०% या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे गुण मिळवून सुयश मिळविले आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, कार्याध्यक्षा सौ. गीता पालरेचा व सचिव रविकांत घोसाळकर यांनी विद्यालयाच्या या यशाबद्दल प्राचार्य शिरीष येरूणकर, तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक मोहनराव थोरबोले, दादासाहेब हाटे, वसंत थोरात, अस्मिता महाबळे, रेणुका धनावडे, हनुमंतराव काळे, भगवान काळे, उदय घोसाळकर यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
विद्यालयाच्या या यशाबद्दल पंचक्रोषीतील पालकर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरल्याचे दिसत आहे. आंबेवाडीचे सरपंच व स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुरेशदादा महाबळे यांनीही विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment