मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

दिनेश महाडीक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर 

माणगांव (राजन पाटील) : शिक्षणासह सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने सन २०२०-२१या चालू शैक्षणिक वर्षाचा 'आदर्श शिक्षक पुरस्कार' रायगड माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनेश महाडीक यांना जाहीर झाला आहे. 

माणगाव तालुक्यातील बामणगावचे सुपूत्र असलेले महाडीक सर सलग २१ वर्षे कांदळगाव हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सेवा करीत आहेत. श्रीसांप्रदायाच्या माध्यमातून श्रीदासबोधाचे निरूपण तसेच सामाजिक कार्यात ते अग्रेसर आहेत. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलनासाठी ते प्रयत्न करतात. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, वंचितांचे शिक्षण याकरिता ते प्रयत्नशील असतात. अशा बहुआयामी शिक्षकाचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान झाल्याने संस्थेचे अध्यक्ष संजीव जोशी, सचिव सुनिल जगताप यासह रा.जि.प.सदस्या आरती मोरे, तालुक्यातील उभरते विकसनशील नेतृत्व रमेश मोरे यांनी महाडीक सरांचे अभिनंदन केले आहे. याचबरोबर बोरवाडी, कांदळगाव पंचक्रोशी तसेच शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog