ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

चंद्रकांत खेडेकर यांचा स्वयंरोजगार आदर्शवत

माणगांव (राजन पाटील) :

ज्यांना नोकरी नाही पण व्यवसाय, धंदा आहे त्यांची व चाकरमानी यांची उपासमार झाली. त्यामुळे मुंबईचे चाकरमानी व छोटे उद्योग धंदेवाले नाईलाजाने गावाकडे आले. दुबार भातशेतीचे पीक नसल्याने गावाकडचेही सर्व व्यवहार ठप्प झाल्याने सर्वत्र नैराश्य होते. मात्र या सर्व परिस्थितीला  छेद देत मांजरवणे पंचक्रोशीतील वडाची वाडी येथील चंद्रकांत खेडेकर यांनी निराश न होता  स्वतःचा कामधंदा सुरु केला. त्यामध्ये त्यांनी ओली व सुकी मच्छी, भाजी, मिरची, गावागावात जावून विकली. धंद्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. स्वतःकडे  विविध खाद्यपदार्थ बनविण्याची कला असल्याने त्यांनी आपल्या घराशेजारी रस्त्यालगत वडापावचा स्टॉल टाकला. श्री समर्थ बळावर त्याला जोड म्हणून कांदा भजी, गोलभजी, चायनीज भेळ, मंचूरीयन भेळ, सूप, अवघ्या 10/- रुपयात  विकण्याचा निर्धार केला. आज खवय्यांच्या उदंड प्रतिसादामुळे त्यांचा व्यवसाय तेजीने चालत आहे. या मांजरवणे परिसरात हा समर्थ वडापाव सेंटर वरदान ठरत आहे. या दुर्गम व डोंगराळ परिसरात जर कोण आजारी पडला तर हेच चंद्रकांत खेडेकर मोठ्या हिमतीने रात्री-अपरात्री गोरेगाव- माणगाव येथे दवाखान्यात नेतात. अशा या प्रेमळ-निर्मळ स्वभावाच्या माणसाने समोरच्या माणसाचे जग जिंकल्याने धंदा व्यवसायात ते यशस्वी आहेत. ते म्हणतात, 'आयुष्यात माणसाच्या अंगात जिद्द, चिकाटी असेल तर आपण धंदा-व्यवसायातच काय तर जीवनात देखील यशस्वी होऊ शकतो. अशा या व्यक्तीचा आदर्श आज सर्वांनी घेण्याची गरज आहे.

Comments

Popular posts from this blog