१ नोव्हेंबर रोजी तळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
माणगांव (राजन पाटील) : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवंर आज संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत आहे. जेमतेम सहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. याकरिता रक्तदान करून रूग्णाला जीवदान देण्याचे महान कार्य या शिबिरात येऊन करू या. तळा तालुक्यातील सर्व नागरिक व सरकारी कर्मचारी वर्गाने या शिबिरात येऊन रक्तदान करावे. तळा शहरामध्ये तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ व रायगड भूषण, समाजसेवक कृष्णा महाडिक तसेच सायन हॉस्पिटल मुंबई यांच्या सहकार्याने रविवार दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० या कालावधीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदानाचे शिबिर यशस्वी करण्यासाठी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, उसर हायस्कूल, बोरघर हायस्कूल, पढवण हायस्कूल, पिटस ई-हायस्कूल, ग्रामसेवक संघटना, तळा तालुका पत्रकार संघटना, हौशी बालमित्र मंडळ भोईर वाडी, गो .म. वेदक प्रतिष्ठान, नामदेव युवक मंडळ, माऊली सेवा मंडळ मुंढेवाडी, रोहिदास युवक मंडळ, बौद्धजन पंचायत समिती, कुणबी युवक मंडळ, चंडिकापुत्र कबड्डी संघ, नाभिक संघटना, मिनिडोर संघटना, व्यापारी असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, क्षत्रिय मराठा समाज, सर्व प्राथमिक शिक्षक संघटना, भारतीय बौद्ध महासभा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती संघटना, बौद्ध जन पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक पदवीधर शिक्षक व केंद्र प्रमुख संघटना, संत गाडगे महाराज तरूण मंडळ परिटवाडी, तळा तालुका सरपंच व उपसरपंच, सभापती व उपसभापती, पंचायत समिती सदस्य, सर्व जिल्हा परिषद सदस्य यासाठी अतिशय मेहनत घेत आहेत. तळा तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील सर्व देशप्रेमी नागरिक व सर्व कर्मचारी यांनी येऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


Comments
Post a Comment