मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

निजामपूरमध्ये मुख्य रस्त्यावरील खड्डा ठरतोय जीवघेणा! 

माणगांव (राजन पाटील) : सद्यस्थितीमध्ये कोरोनाचे सावट कमी होऊन हळूहळू पुण्याहून व मुंबईहून विळा-भागाडमार्गे श्रीवर्धनकडे येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास सुरु झाला आहे. त्यातच औद्योगिक केंद्र असलेल्या विळे-भागाड येथे कामाकरिता ये-जा करणाऱ्या बसेस, दुचाकीस्वार व माणगांव सारख्या तालुक्याच्या ठिकाणी निजामपूर विभागातील मार्गस्थ माणगांव-पुणे या रस्त्यावरून सतत प्रवास करत असतात. दरम्यान निजामपूर गावातील बोरवाडी फाट्याजवळ अगदी गजबजलेल्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर पडलेल्या या मोठ्या जीवघेण्या खड्डयामुळे अगांतुक आलेल्या पर्यटकांचा अथवा स्थानिक दुचाकीस्वारांचा या खड्डयात जीव जाण्याची शक्यता आहे. हा जीवघेणा प्रसंग थांबवायचा असेल तर सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा खड्डा  बुजवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सद्यस्थितीमध्ये या खड्डयाला वळण घेण्यासाठी अडथळा पुरक साधन लावलेला आहे.

Comments