बोर्ली पंचतन परिसरात मोबाईल नेटवर्कचा बोजवारा, ऑनलाईन शिक्षणाला मोबाईल नेटवर्कमुळे अडथळा
शिवसेना आक्रमक! कंपनीच्या टॉवरकडे धाव, बारा दिवसांचा अवधी, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन
व्होडाफोनच्या अधिकाऱ्यांनी मागितली मुदत
बोर्ली पंचतन (मुझफ्फर अलवारे) : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन, दिवेआगर, भरडखोल, वडवली, शिस्ते या भागामध्ये व्होडाफोन-आयडिया, जिओ या कंपन्यांकडून देण्यात येत असलेली मोबाईल नेटवर्क सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून मागील वर्षभरामध्ये या कंपन्यांची सेवा सुधारत नसल्याने व कंपनीला ग्राहकांच्या तक्रारींकडे बघण्यासाठी वेळच नसल्याने शिवसेना आता अधिक आक्रमक झाली असून मोबाईल टॉवर असणाऱ्या ठिकाणी धडक दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सेवा पुढील दिवसात निश्चित सुरळीत होईल असे आश्वासन दिल्याने शिवसैनिक शांत झाले व पुढील १० नोव्हेंबर पर्यंत सर्व मोबाईल कंपन्यांची सेवा चांगल्या प्रकारे सुरू झाली नाही तर शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा उपतालुकाप्रमुख सुकुमार तोंडलेकर यांनी अधिकाऱ्यांजवळ झालेल्या चर्चेदरम्यान दिला.

Comments
Post a Comment