ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

तळा येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न 

माणगांव (राजन पाटील) : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आज सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे. हे लक्षात घेता आज असंख्य रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वरदान ठरणाऱ्या रक्ताचा साठा उपलब्ध व्हावा याकरता तळा हायस्कूल येथे तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ व समाजसेवक रायगड भूषण श्री. कृष्णा महाडिक तसेच सायन रूग्णालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले. 

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी तळा तालुका पंचायत समिती सभापती सौ. अक्षरा कदम, तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. रेश्मा मुंढे, आयोजक समाजसेवक तथा रायगड भूषण श्री. कृष्णा महाडिक, तळा विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत रोडे, सचिव श्री. महेंद्र कजबजे, श्री. किरण शेठ, देशमुख सायन रूग्णालयाचे श्री. शुभम भोई, पत्रकार श्री. पुरुषोत्तम मुळे, पत्रकार संजय रिकामे, उसर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब दुधाळ, तळा हायस्कूल व महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय सदस्य, सर्व कर्मचारी तसेच सदर शिबीर यशस्वी करणाऱ्या सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या शिबीरात विविध रक्तगटाच्या १७१ पिशव्यांचे संकलन करण्यात आले. तळा तालुक्यातील आजपर्यंतच्या इतिहासातील रक्तदानातील हा नवा उच्चांक असल्याने तळा तालुक्यात देशप्रेमासह माणूसकीचे दर्शन घडल्याने आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ, पोलीस स्टेशन तळा, तहसील कार्यालय, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, उसर हायस्कूल, पढवण हायस्कूल, बोरघर हायस्कूल, पिटस ई-हायस्कूल, ग्रामसेवक संघटना, तळा तालुका पत्रकार संघ, हौशी बालमित्र मंडळ भोईरवाडी, गो. म. वेदक प्रतिष्ठान, नामदेव युवक मंडळ, माऊली सेवा मंडळ मुंढेवाडी, रोहिदास युवक मंडळ, बौध्दजन पंचायत समिती, कुणबी युवक मंडळ, चंडिका पुत्र कबड्डी संघ, नाभिक संघटना, मिनीडोअर संघटना, व्यापारी असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, क्षत्रिय मराठा समाज, सर्व प्राथमिक शिक्षक संघटना, भारतीय बौध्द महासभा, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, बौद्धजन पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक पदवीधर शिक्षक व केंद्र प्रमुख संघटना, संत गाडगे महाराज तरूण मंडळ परिटवाडी, तळा तालुका सरपंच व उपसरपंच, सभापती व उपसभापती, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य यांच्या सर्वांच्या सहकार्याने, योगदानाने, मेहनतीने हे शिबीर मोठ्या संख्येने संपन्न झाले.

Comments

Popular posts from this blog