ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

कोविड काळातही आदिवासी विद्यार्थी शिक्षणात रमले! 

ज्योती अवघडे, इला गोरे व जगदिश डंगर यांचा अनोखा उपक्रम 

राज्य शासनाने घेतली दखल! 


माणगांव (राजन पाटील) : अलिकडच्या काळात शिक्षक व शिक्षण याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. कोविड काळात शिक्षकांना मिळणाऱ्या सुट्टया, सवलत यांबद्दल अनेकांनी आगपाखड केली. मात्र कोविड काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा म्हणून शाळा बंद होत्या. मात्र शिक्षण चालू होते. काही हाडाच्या शिक्षक व सहकारी बंधूंनी आपला अमूल्य वेळ आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या विकासाकडे तर दिलाच, पण त्याचबरोबर जे विद्यार्थी आदिवासी वाड्यांत राहतात त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी पेण तालुक्यातील रा.जि.प. वरवणे शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती अवघडे, इला गोरे व जगदीश डंगर यांनी अनोखा उपक्रम हाती घेऊन  मोबाईल, भ्रमण संगणक व गप्पा, गाणी-गोष्टी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करून शिक्षण देण्याचा एक अनोखा उपक्रम घेतला की ज्या उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेतली. त्याची  सविस्तर माहिती जाणून घेऊया...

कोविड काळातील मुलांचे शिक्षण या विषयाला अनुसरून आज रा.जि.प. शाळा वरवणे येथील मुलांना शिक्षण देण्यासाठी वरवणे येथून दोन कि.मी. दूर असणाऱ्या आदिवासी वाडीवर मुलांना शिकवण्यासाठी मुख्याध्यापक ज्योती अवघडे, इला गोरे, जगदीश डंगर हे सर्वजण मुलं शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावीत, कोविड काळात त्यांचं शिक्षण चालू रहावं म्हणून डांगलवाडी याठिकाणी जात असतात. ही वाडी आदिवासी वाडी असून येथे रहाणारी मुलं कातकरी समाजाची आहेत. ऑनलाइन शिक्षण देत असताना ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाऊ नयेत म्हणून या मुलांना लॅपटॉप व मोबाईलच्या साहाय्याने व व्हिडीयो निर्मीती करून त्यांना शिकवण्याचा हा प्रयत्न आणि त्याला साथ देणारी दोन तरुण मुलं ज्यांना मुलं शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावीत म्हणून त्यांना शिक्षण द्यायला आवडत, या उपक्रमाची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली आहे. या मुलांचे शिक्षण चालू रहावे म्हणून त्यांना इला गोरे व जगदीश डंगर यांच्याकडून स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. तसेच काही स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती ज्योती अवघडे यांनी केली आहे. दर महिन्याला ही स्वाध्याय पुस्तिका मुलांना वाटप केली जाते व सोडवून घेऊन त्यांना त्याबाबत मार्गदर्शन केले जाते. आनंददायी शिक्षण व बालस्नेही शिक्षण पद्धतीचा अवलंब करून या मुलांना शिक्षण देण्याचे काम श्रीमती. अवघडे करीत आहेत. मुलांचे शिक्षण बंद न रहाता ते अखंड चालू रहावे म्हणून विवीध व्हिडीयो निर्मिती तसेच विविध उवक्रम त्या शाळेवर राबवित असतात. या अनोख्या उपक्रमाबद्दल ज्योती अवघडे, इला गोरे व जगदीश डंगर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Comments

  1. Great job.. Proud of you Ela.. May God bless you with the same zeal n love always ❤️❤️❤️

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog