ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

विश्व हिंदू परिषद माणगांव प्रखंडाकडून दिवाळी फराळाचे वाटप

माणगांव (राजन पाटील) : आपल्यासह आपल्या अखिल समाजाची उन्नती व्हावी. हिंदू समाज सुरक्षित रहावा तसेच हिंदू धर्मातील देव-देवतांचे अस्तित्व अभेद्य व अबाधित रहावे, हिंदू संस्कृतीचे जतन करण्यासाठी "धर्मो रक्षति रक्षित:" हे ब्रीदवाक्य घेऊन संघ संस्काराद्वारे शिक्षण, आरोग्य व सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या "विश्व हिंदू परिषदेच्या माणगाव प्रखंडाकडून शिरवली आदिवासी वाडी, कुमशेत आदिवासी वाडी, म्हातपोली आदिवासी वाडी वरील वनवासी बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अॅड. अनिकेत ठाकूर, योगेश पालकर, विशाल काळोखे, सुयोग दिवेकर, राज गायकवाड, प्रतिक दिवेकर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी फराळाचे वाटप केले. 

हिंदू धर्मात सण व उत्सव यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे सण व उत्सव साजरे करताना सामाजिक समरसता यावी या हेतूने तसेच वनवासी बांधव हा हिंदू समाजाचा एक घटक असल्याने त्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करावी या उद्देशाने विश्व हिंदू परिषदेने या उपक्रमाचे आयोजन केले आहे असे मत अॅड .अनिकेत ठाकूर यांनी व्यक्त केले . 

या वनवासी समाजाची उन्नती होण्यासाठी अखिल भारतात एकल विदयालय, आरोग्य सेवा, वसतिगृह, विविध मंदिर, समाज मंदिर यांची निर्मिती केली आहे. हिंदू संस्कृतीचे जतन व हिंदू संस्कार  अबाधित रहावे याकरिता कार्य करणाऱ्या या विश्व हिंदू परिषद माणगाव प्रखंडाच्या कार्याला वनवासी वाडीवरील बांधवांनी पाठिंबा व शुभेच्छा दिल्या. यामध्ये कुमशेत आदिवासी वाडीवरील शैलष हिलम, अनंत हिलम, शांताराम पवार, संतोष पवार तर शिरवली आदिवासी वाडीवरील अर्जुन वालेकर, बाळाराम पवार, गणेश पवार, मंजुळा पवार, संदिप पवार, हरिश्चंद्र पवार आदी मान्यवर सहभागी होते.

Comments

Popular posts from this blog