शिक्षकांची बदनामी करणाऱ्या दै. लोकपत्र मधील लेखनाचा व लेखकाचा जाहीर निषेध
माणगांव (राजन पाटील) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोविड योद्धे म्हणून सरकारने विश्वासार्हपणे सरव्हेक्षण करणे, शरीरातील प्राणवायू, तापमान यांची नोंद करणे, कोविड काळात रस्ते, रेशन धान्य दुकान, गाव, वाडी, वस्ती यांमध्ये धाडसाने जावून सर्व्हेक्षण करण्याचे काम, त्याचबरोबर कोविड काळातील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर गाव, शहरात जावून सोशल डिस्टंसिंगचे व सेनीटायझरचे वापर करून अध्ययन व अध्यापनात सहकार्य करणाऱ्या त्याचबरोबर ज्या गावात नेटवर्क आहे तेथील विदयार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास प्रामाणिकपणे देणाऱ्या शिक्षकांबददल एम.आय.डी.सी. चिखलठाणा, औरंगाबाद येथून प्रसिद्ध होणाऱ्या दै. लोकपत्र नावाच्या पेपरचा संपादक रविंद्र तहकिक या व्यक्तीने दि. ८ नोव्हेंबर रोजीच्या वर्तमानपत्रात शिक्षकांप्रती हेतूपुरस्सर द्वेषभावनेने, अवमानकारक शिक्षकांच्या भावना दुखावणारा लेख प्रसिध्द केला आहे. त्या लेखाचे व तो प्रसिद्ध करणाऱ्या संपादक रविंद्र तहकीक यांचा जूनी पेन्शन हक्क संघटना माणगाव, रायगड जाहीर निषेध करते.
संबंधित लेखात शिक्षकांना मिळालेली वाढीव सुट्टी, पगार म्हणजे मालमत्ता कि पेंड, ५०% उपस्थिती म्हणजे ५०% सुट्टी, आनलाईन शिक्षण प्रक्रिया फसणे, सोशल मिडियाचा वापर, खायला काळ अन भूईला भार, पाच-पाच हजाराचे कपडे अन टू व्हिलर, फोर व्हिलर, सरकारचे जावई अशी उपरोधिक टिका-टिप्पणी करण्याच्या लेखनात सत्यता तर नाहीच, पण उलट आपण केलेले हे आरोप निषेधार्थ आहेत. शिक्षकी पेशावर असे आरोप करताना विचार करून करावेत. शासकीय सुट्टया या विदयार्थ्यांच्या मानसिकतेशी निगडीत असतात. शिक्षकांचे पगार केंद्रीय वेतन आयोगाने ठरवून दिलेले असतात. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा म्हणून ५०% उपस्थिती ठेवलीय. खायला काळ अन भूईला भार असे म्हणत असाल तर एकदा रायगड जिल्ह्यात येवून बघा. निसर्ग चक्रिवादळात इथला शिक्षक, त्याचे घर, परिसर व त्याची शाळा सांभाळतांना व सुधारताना नाकी नवू आले. पण त्यातही खचून न जाता शासनाच्या मदतीची वाट न पाहता स्वतः च्या कष्टाने स्वतःचा संसार, स्वतः ची शाळा पूर्ववत केली हे अभिमानास्पद आहे.

या तथाकथित संपादकास शिक्षकांविषयी कावीळ झालेली आहे असे वाटते, त्याच्या मते शिक्षकांनी टोपी धोतर वापरावे, सायकल वर प्रवास करावा, झोपडीत रहावे, समाजात काय चालले आहे तिकडे पाहू नये असे वाटते काय?
ReplyDeleteया (अ)जानत्या संपादकास रस्त्यावरील खड्ड्यात रोज मरणारे दिसत नाही, बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी कुठे आहेत हे दिसत नाही