विनायक भाऊ तटकरे यांना पितृशोक
गोरेगांव (अजय होळकर) : गोरेगांव चिंचवली वाडी येथील गोरेगांव रा.जि.प. मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपविभागीय अध्यक्ष विनायक भाऊ तटकरे यांचे पिताश्री तथा उद्योगपती रमेश दादा तटकरे यांचे दि. १३ नोव्हेंबर २०२० रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी यांचे वय ७० वर्षे होते. उद्योगपती रमेश दादा तटकरे हे गोरेगांवचे दानशूर व्यक्तीमत्व होते. सर्व धर्मांत ते सुपरिचित होते. ते मनमिळावू स्वभावाचे होते. चिंचवली वाडी ग्रामस्थ मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सल्लागार तसेच नवरात्र उत्सव मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिण, भावजय, मुले, मुली, पुतणे, सुना, नातवंडं असा मोठा परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य दि. २४ नोव्हेंबर रोजी चिंचवली वाडी येथे त्यांच्या राहात्या घरी होणार आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने संपूर्ण चिंचवली वाडी तसेच गोरेगांववर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यविधीला सर्व धर्मांतील लोक उपस्थित होते.

Comments
Post a Comment