माणगांव तालुक्यातील नाभिक समाजातील प्रत्येक घटकाला याेग्य न्याय मिळवून देऊ - दिनेशभाई माेरे
माणगांव (राहुल कडव) : पूर्वपरंपरागत चालू असलेल्या बारा बलुतेदारापैंकी नाभिक समाज हा अल्पसंख्याक समाज आहे आणि खेडाेपाडी विखुरलेला आहे. अशातच काही प्रमाणात बलुतेदारी ही संपुष्टात येत नाभिक समाज बांधव देखील विविध क्षेत्रात कार्यरत झाले. मात्र समाज एकसंघ ठेवण्याची जबादारी जिल्हा सदस्य, विश्वस्त व सल्लागार यांनी नेहमीच पेलली आहे.
रायगड जिल्हा नाभिक संघाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दिनेश भाई माेरे यांनी २१ डिसेंबर राेजी माणगांव तालुक्यातील नाभिक समाजातील सलुन व्यवसायिकांसाेबतच शिक्षण, सेवा पत्रकारिता क्षेत्रातील विविध समाजघटकांशी संवाद साधला. यामध्ये माणगांव तालुक्यातील समाज बांधव हे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे केवळ सलुन व्यवसायिक म्हणजे नाभिक समाज नसून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या समाज बांधवांना एकत्रित आणून समाज संघटना मजबूत करण्याचा मानस देखील नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला. तसेच लवकरच सलुन व्यवसायिंकासाठी मार्गदर्शन शिबिर (सेमीनार) आयोजित करणार असल्याचे सुचक वक्तव्य देखील केले.
या चर्चेवेळी जिल्हा सदस्य किरण घाडगे, महाड सलुन संघटना अध्यक्ष राकेश पांडे, जिल्हा सहसचिव सचिन दिवेकर, माणगांव तालुक्यातील विभागीय अध्यक्ष महेंद्र जाधव, राजेंद्र जाधव, कांता हुजरे, अजित हुजरे, निलेश भाेसले, सचिन जाधव आदींसह नाभिक समाजातील विविध क्षेत्रातील समाजबांधव उपस्थित हाेते.

Comments
Post a Comment