मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

माणगांव नाभिक समाजाकडून हुतात्मा वीर भाई काेतवाल पुण्यतिथी साजरी

युवा व ज्येष्ठ नाभिकांकडून आदरांजली

माणगांव (राहुल कडव) : नाभिक समाजाचे रायगडचे क्रांतीसुर्य  वीर भाई विठ्ठल लक्ष्मण काेतवाल म्हणजेच वीर भाई काेतवाल यांचा जन्म १ डिसेंबर १९१२ राेजी रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे झाला व ब्रिटीश सैनिकांशी दाेन हात करताना २ जानेवारी १९४३ राेजी सिद्धगडावर त्यांना हौतात्म्य आले. अशा महान क्रांतीकारकाची २ जानेवारी राेजी पुण्यतीथी. ही पुण्यतिथी अवघ्या महाराष्ट्रभर नाभिक समाजाकडून विविध समाजपयाेगी कार्यक्रमांनी साजरी केली जाते. हुतात्मा होणे सोपे नसते. वीर भाई काेतवालांना उच्च शिक्षित असताना चांगली सरकारी नोकरी किंवा व्यवसाय करून सहज भरपूर पैसा कमावून पेन्शन खात बसता आले असते. वैयक्तीक सुख, कुटूंबावर पाणी सोडून देश आणि देशाचे किंबहुना सर्व नागरिकांचे स्वातंत्र्य जर लढा उभारून मिळविता आले तर आपलाही खारीचा वाटा असू शकेल या भावनेने वीर हुतात्मा भाई कोतवाल भूमीगत राहून ब्रिटिशांबरोबर लढत होते. ते ही सिंहासारखे लढता लढता आपले प्राण त्यांनी देशासाठी त्यागले. त्यांची प्रेरणा होती छत्रपती शिवाजी महाराज, वीर जिवा महाले, वीर शिवा काशिद अश्या थोर स्फूर्तिस्थानांपासून प्रेरणा घेऊन आपली वाटचाल  केली पाहीजे 

यावर्षी काेराेनाचे सावट व प्रशासनाचे निर्बंध असल्यामुळे अगदी साधेपणात पुण्यतिथी साजरी करण्यात आली. माणगांव तालुक्यात शहरातील दत्तनगर परिसरात नाभिक समाज बांधव राहुल बबन कडव यांच्या निवासस्थानी हुतात्मा भाई काेतवाल यांच्या प्रतिमेचे पुजन करुन दिपप्रज्वलन करुन भाईंना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी  माणगांव नाभिक समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक किरण जाधव, बबन कडव, माणगांव तालुका सेक्रेटरी राजेंद्र जाधव, माणगांव विभागीय अध्यक्ष महेंद्र जाधव, माणगांव शहर पदाधिकारी अजित हुजरे, निलेश भाेसले, रुपेश भाेसले, निजामपुर विभाग सदस्य आकाश पालांडे व असंख्य युवा व तरुण वर्गाने हुतात्मा वीर भाई काेतवाल यांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थिती दर्शविली. अशा पद्धतीने पुण्यतिथी साेहळा उत्साहात पार पडला.

Comments

Popular posts from this blog