मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨

बोर्लीपंचतन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बोर्लीपंचतन (मुझफ्फर अलवारे) : भारताचा ७२ वा  प्रजासत्ताक दिन बोर्लीपंचतन येथे उत्साहात साजरा झाला. उपसरपंच प्रकाश तोंडलेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या तर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये माजी सैनिक शामकांत जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. श्री मोहनलाल सोनी विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी ध्वजगीत व देशभक्तिपर गीते सादर करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी, माजी सरपंच व सदस्य, गावातील मान्यवर, सर्वपक्षिय नेते, कार्यकर्ते, शिक्षक उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरपंच यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व उपस्थितांचे स्वागत करुन बोर्ली पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व कोरोना महामारीचे संपुर्ण निर्मुलन होईपर्यत आपण शक्य तिथे मास्क व शारीरीक अंतराचे पालन करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.

Comments

Popular posts from this blog