कुणबी युवा आयोजित गाव विकास चळवळ व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न
कार्यकर्त्यांनी नेहमी त्यागाची भूमिका घेणे महत्वाचे असते - प्रा. सुनिल देवरे
यावेळी मार्गदर्शक सुनिल देवरे, अॅड. रोशन पांढरे, तळा शाखेचे मुंबई व ग्रामीण पदाधिकारी व चार ग्रुपचे अध्यक्ष उपाध्यक्ष, कुणबी बांधव, ओबीसी वर्ग आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रा. सुनील देवरे यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटले गाव विकास चळवळ कशी मजबूत करावी आणि त्यासाठी काय करावे, कार्यकर्ता कसा असावा, कार्यकर्ता नेहमी स्वयंप्रेरित असावा,समाजासाठी काम करत असताना कार्यकर्त्यांनी आपला कुटुंब सोबत असेल तर गाव आणि समाज सोबत असेल. आपल्या भावकीत गावकीत समाजात गावात कार्यकर्ता संयमी असावा. कार्यकर्त्यांनी नेहमी त्यागाची भूमिका घेणे जरुरी असते, काम करत असताना मान सन्मानाची अपेक्षा न करता अपमानही सहन करणारा संयमी विचारांचा कार्यकर्ता असावा, समाजाच्या कामासाठी वेळ देणारा कार्यकर्ता असावा.
त्यानंतर अॅड. रोशन पांढरे यांनी मोबाईल सोशल मीडियाचा दुरूपयोग आणि त्यापासून होणारे फायदे आणि तोटे त्याबाबत कायद्याची माहिती देऊन सर्वांना सावध राहण्याचा सल्ला दिला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मार्गदर्शन पर मनोगते व्यक्त केली.

Comments
Post a Comment