मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

ओबीसी संघर्ष संघर्ष समिती स्थापन करण्या बाबत सहविचार सभा


तळा (कृष्णा भोसले) :
कुणबी भवन तळा येथे ओबीसी संघर्ष समन्वय समिती स्थापन करण्याबाबत तळा तालुका संघटनेची सभा जिल्हा पदाधिकारी उदय कठे व तालुका समन्वयक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यामध्ये ओबीसी प्रवर्गातील येणाऱ्या विविध समाजाचे अध्यक्ष, सचिव व प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी उदय कठे, सचिन कदम, नामदेव काप, रमेश पिंपळे, नाना भौड, पुरूषोत्तम मुळे, कमळाकर चोरगे यांनी ओबीसी समाजाबाबतच्या अडीअडचणी या विषयावर मार्गदर्शन केले व तालुका संघर्ष समिती स्थापन करणे का आवश्यक आहे? ती समिती कशी असावी? कोणते सदस्य नेमावे? या विषयावर चर्चा करून मार्गदर्शन केले. यावेळी समाजाचे अध्यक्ष व सचिव भानू मंचेकर, नागेश लोखंडे, तुकाराम पाटेकर, गणेश राणे, चंद्रकांत भोरावकर, पांडूरंग कळंबे, महेंद्र कजबजे आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी विभागवार प्रतिनिधी व पदाधिकारी घेऊन ओबीसी संघर्ष समिती स्थापन करण्यासाठी शनिवार १३ फेब्रुवारी रोजी सभा घेण्याचे ठरविले आहे

Comments

Popular posts from this blog