ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

ओबीसी संघर्ष समन्वय समिती तळा तालुकाध्यक्षपदी सचिन कदम


तळा (कृष्णा भोसले) : तळा तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीची सभा १३ फेब्रुवारी रोजी कुणबी भवन तळा येथे घेण्यात आली. या सभेत कार्यकारिणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी सचिन कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा समन्वयक उदय कठे, सुरेश मगर, सभापती अक्षरा कदम, महादेव सरसंबे, शिवराम महाबळे, सुदाम शिंदे, नामदेव काप, भानू मंचेकर यांनी ओबीसी समाजाच्या समस्या अडचणींबाबत चर्चा करून ओबीसी समन्वयक समितीची आवश्यकता का आहे यावर चर्चा करून तळा तालुका ओबीसी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष सचिन कदम, सरचिटणीस कृष्‍णा खांडेकर, खजिनदार नाना भौड, उपाध्यक्ष खेळू वाजे, प्रकाश कांबळे, समीर शिर्के, राजेंद्र कुडेकर, सहचिटणीस संध्या ठाकूर, दिलीप पांचाळ, कमळळाकर चोरगे, लिलाधर खातू, तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून पुरुषोत्तम मुळे, बबन चाचले, प्रदुम्न ठसाळ, अनंत खराडे, रवी मांडवकर, राम सावंत आदींची कार्यकारणी करण्यात आली आहे. नवनिर्वाचित कार्यकारणीचे यावेळी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आली आहे. नवनिर्वाचित अध्यक्षांनी म्हटले सर्वांच्या सहकार्याने मी आपल्या सर्वांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द राहीन. या कार्यक्रमाला ओबीसी समाजातील समाजबांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog