ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

तळा शहरात पथनाट्यातून कोरोना जनजागृती


तळा (कृष्णा भोसले) : तळा शहरात समय क्रिएटिव्ह सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था कलापथकाकडून कोरोना बाबत जनजागृती करण्यात आली. कोरोना काळातील शासनाची कामगिरी, भूमिका, नागरिकांसाठी राबविलेल्या विविध योजना यांची माहिती देण्यासाठी तसेच कोरोना आजाराबाबत कोणती खबरदारी घ्यावी यासाठी माहिती जनसंपर्क महासंचनालय जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाने समय क्रिएटिव्ह सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था कलापथकाची नियुक्ती केली आहे. या पथकांमार्फत जिल्ह्यातील गावांगावात जाऊन कोरोना बाबत जनजागृती करणार आहेत. त्यानुसार मंगळवारी तळा शहरातील बसस्थानक व बळीचा नाका परिसरात या पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. यामध्ये सामाजिक अंतर, मास्कचा वापर, स्वच्छ हात धुणे, माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझी कन्या भाग्यश्री, जननी सुरक्षा, कन्यादान योजना, मुख्यमंत्री स्वावलंबन योजना, प्रधानमंत्री मुद्रा लोन अशा विविध योजनांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी तळा शहरातील नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog