लोणेरेतील मटका व जुगार कायमस्वरूपी बंद करण्याची महिला व ग्रामस्थांची मागणी!
माणगांव (पदमाकर उभारे) : माणगांव तालुक्यातील मुंबई-गोवा हायवे लगत लोणेरे हे एक छोटेसे शहर असून या लोणेरे गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ असून या गावाचे नाव सर्वत्र राज्यात व देशात प्रसिद्ध आहे. तसेच देशभरातून या विद्यापीठात विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी येत असतात अशा या परिसरात भरदिवसा मटका, क्लब, जुगार व व्हिडीयो गेम पार्लर, लॉटरी हे अनाधिकृत धंदे चालू असून हे धंदे गोरेगाव पोलीसांनी कायमस्वरूपी बंद करावे अन्यथा लोणेरे ग्रामस्थ व महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा माणगांव तहसीलदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी माणगांव यांना लेखी निवेदन देतेवेळी महिला वर्गाने बोलताना सांगितले. यावेळी शंकुतला टेंबे माजी पं. स. सभापती माणगांव, विठाबाई टेंबे, मोहीनी टेंबे, भारती टेंबे, अनिता टेंबे, नंदा टेंबे, नकुशा टेंबे, मंदा टेंबे, मनिषा टेंबे, संगीता टेंबे, सुरेखा टेंबे, सुनिता टेंबे या महिला वर्गानी पुढे बोलताना असे सांगितले की लोणेरे हे एक छोटेसे शहार असून येथे मटका, क्लब, जुगार व विडीओ गेम पार्लर लॉटरी हे अनाधिकृत धंदे गेल्या अनेक वर्षापूर्वी पासून चालू असून याकडे गोरेगाव पोलीस ठाणे जाणून बूजून दुर्लक्ष करत आहे. या मटका जुगारामुळे तरूणवर्ग तसेच घरातील कर्ते कमवते पुरूष हे या मटका, जुगार, व्हिडीयो गेम, लॉटरीवर जाऊन पैसै उधळत असून लोणेरे गावातील काही कुंटूब हे उध्वस्त झाली आहेत सकाळपासूनच मटका जुगार व दारूच्या आहारी हे पुरूष व तरूण जात आहेत. गोरेगाव पोलीस ठाणे तसेच काही राजकीय पुढारी या मटका जुगार चालवणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालत असल्याचे सांगितले. तसेच या महिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी माणगांव यांची भेट घेऊन पत्र दिल्याने या पत्राची त्वरित दखल घेऊन त्यांनी महिलांना घेऊन या मटका जुगार ठिकाणी पहाणी केली असता या मटका जुगार चालवणाऱ्याने आधीच पळ काढला होता. तसेच लोणेरे महिलांनी खासदार सुनिलजी तटकरे, रायगड जिल्हा पालक मंत्री कु. अदितीताई तटकरे, पोलीस अधिक्षक रायगड जिल्हा यांना देखील लेखी निवेदन दिले असून हा मटका जुगार कायम स्वरूपी बंद न केल्यास आम्ही लोणेरे ग्रामस्थ महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.

खुपच छान जे जुगार चालवता त्यान चपल्च हार घालून गावात फिरवायला पाहिजे
ReplyDeleteउसरघर गावात क्लब चालावनरे आहेत.
त्यांच बंदोबस्त करणे महत्वाचे आहे.
मी तुमच्या बरोबर आहे.वरची आली उस्ररघर विशेष करून माणगाव तालुका रायगड जिल्हा आमचेच क्लब चालतत असे बोलणारे आहेत .
जुगार कुलस्वामिनी देवल्त.पाणी टाकी येतेय चालता.गावच नाव तर करता पंन अता आई बहिनीची ईजत पंन असे 25 वर्ष पासुन आहे.
यांच जुना बिस्नेस लोकांच्या जमिनी हडप कर्यच्या रजिस्टर करून पंन हडप केलय.मी स्वत राजेश नामदेव ढेपे.आमची वडिलांची जमीन गणपत वितोबा ढेपे याने हडप केलय.33 गुन्टे
93 अ यांच मुलागा गणेश गणपत ढेपे त्यांच भाऊ
शंकर शेट क्लब च्या दादागरी तसेच वरच्या आळीत अजून काही सहकय आहेत आज हि क्लब चालवतत अणि गावात धष्टत निर्मान करतात. यांच्या तर बायका सर् ल बोलतात. पोलिस स्टेशन आम्म्च्या हातात आहे.
माझ्या वर केस करण्याच किती प्रयत्न केला.
मला एकच मनय्च जुगारि शेतकरी होहू शकतो का का त्याची मुलाकत टीवी वर तुकाराम खाडे एक नंबरच क्लब चालवणेय .हाच बिज़नेस अजुन एक आहे आता वाशी मदेय चालवतो .
काय नाव तुमी तपासाआ मी मागे लागणरच.
Mi coment takli majya gatil poudari manali ne majya ver 5000rs dand bandle ani gavatun koni bolycaey
ReplyDeleteNai .
47 gelting surung lahun blasting
Viricya navane calu hai bekaydeshir
Please send email I'd
ReplyDeleteKiva watsup number
Maja 8793466888 ha number hai
Ek rajyat don kayde caltaka
Kai video anniversary arj hai teri karvai hot nai