मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨

माणगांव तालुका एज्युकेशन सोसायटीचे तळा इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन

१९७६ बॅचचे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षकांच्या भेटीने गहिवरले!

तळा (कृष्णा भोसले) : अरे उठ लवकर, शाळेला उशीर होतोय’’ इथपासून ते ‘‘इतनी शक्ती हमे देना दाता, विश्वास कमजोर हो ना!’’ अशा ओळींनी सुरुवात व्हायची ती शालेय दिवसांची! आवडत्या तासिका, न आवडते विषय खूप साऱ्या गप्पा भांडण कल्ला म्हणजे ते शालेय सोनेरी दिवस आठवले की कसं त्यात रमावसं वाटतं! शाळा संपली की जो तो आपल्या आयुष्यात संसारात कामात व्यस्त होतो मग कधीतरी जुने दिवस आठवले की जुन्या मित्र मैत्रिणींना भेटण्याची ओढ लागते. अशीच काहीशी स्थिती तळा तालुक्यातील १९७६ च्या बॅच मधील विद्यार्थ्यांची झाले आहे. आताची गोपीनाथ महादेव वेदक विद्यामंदिर तळा म्हणजे तेव्हाची न्यू इंग्लिश स्कूल तळा ही शाळा येथील १९७६ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन कार्यक्रम  रविवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ रोजी आराध्या हॉल तळा येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी अनेक माजी विद्यार्थी आपल्या कुटूंबासमवेत उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी, माजी शिक्षिका सौ शोभा भागवत तसेच भागवत गुरुजी आणि म. ग. जोशी गुरुजी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर हयात नसलेल्या बॅचमधील मित्र-मैत्रिणींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ओळख व आभार प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय वेदक यांनी उत्तम रित्या केले. त्यानंतर अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा सर्व माजी विद्यार्थ्यांची पंगत बसली. भोजन झाल्यानंतर पुन्हा लवकरच भेटूया, या आश्वासनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog