मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

अनावश्यक फिरणाऱ्यांवर रोहा पोलीसांचा वॉच

महत्वाचे काम, वैद्यकीय कामासाठीच सुट; पोलीसांची नाकाबंदी आणि गस्त सुरुच!

रोहा (महेश रावकर) : कोरोनावर मात करण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस प्रशासन सुद्धा कोरोनाला हद्दपार करण्यासाठी दिवस-रात्र गस्त घालून पहारा देत आहे. रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विविध ठिकाणी नाकाबंदी करताना दिसत आहेत. 

लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी रोह्यात जागोजागी पोलिसांची चौकी असून वाहनाची कसून चौकशी सुरु असून गस्तही सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर लवकरात लवकर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन रोहा पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे. 

Comments

Popular posts from this blog