ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

सरकारने सलून व्यावसायिकांच्या कुटूंबांची जबाबदारी उचलावी, आम्ही खुशाल सलून व पार्लर बंद ठेवू - जिल्हाध्यक्ष दिनेश मोरे

माणगांव (राहूल कडव) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लॉकडाऊन व इतर दिवशी जमावबंदी चे आदेश जारी केले आहेत, यामध्ये काय चालू राहणार? काय बंद राहणार? याचा स्पष्ट लेखाजोखा केला आहे व या शासन निर्णयामध्ये सलून स्पा व ब्युटी पार्लर हे बंद राहणार आहेत, मात्र रायगड जिल्ह्यातील नाभिक समाज बांधव व सलून व्यावसायिक यांच्याकडून या निर्णयाला विरोध होत असल्याचे नाभिक समाज संघ रायगड जिल्हाध्यक्ष दिनेश मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. 

सलून व्यावसायिक हे हातावर पोट असणारा समाज घटक आहे, त्यामध्ये मागील वर्ष भरातील जवळपास ७ ते ८ महिने सलून दुकाने बंद राहिल्यामुळे सलून कारागिरांवर उपासमारीची पाळी आली त्यामध्ये महाराष्ट्र मधील बऱ्याच व्यावसायिकांनी आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला होता आता मात्र ह्या सर्व गोष्टी असह्य होणार आहेत.

सरकारने कडक निर्बंध लावून सलून व्यवसाय करताना घ्यावयाचे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या अटी आहेत त्या सलून व्यवसायिकाना नियम घालून द्यावेत त्याचे पालन व्यवसायकांकडून केले जाईल,व जेणेकरून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक वाताहत होणे थांबेल,व तश्या प्रकारचे निवेदन देखील रायगड जिल्हा नाभिक समाजाकडून जिल्हाधिकारी रायगड व मुख्यमंत्री यांना देण्यात येणार असल्याचे देखील दिनेश मोरे यांनी स्पष्ट केले आहे.

आणि उपविभाग अधिकारी माणगाव याना अर्ज देताना जिल्हाध्यक्ष दिनेश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष महेद्र जाधव, अजित हुजरे, प्रतिक भोसले  

राजेद्र जाधव, रूपेश भोसले, मोहन जाधव, बबन कडव,  निलेश भोसले उपसतीत होते.

Comments

Popular posts from this blog