मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

साई येथे सहा दिवसाचे कडक लॉकडाऊन

साई (उमैर सोलकर) : माणगांव तालुक्यातील साई ग्रामपंचायत हद्दीमध्ये व साई बाजारपेठ या ठिकाणी सहा दिवसाचे कडक लॉकडाऊन मंगळवार 15 जून ते रविवार 20 जून या कालावधीत करण्यात आले आहे. या संबंधित गावांमध्ये दोन दिवस अगोदर पूर्व सूचना देऊन दवंडी देण्यात आली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी साई ग्रामपंचायत व या अंतर्गत असणारी गावे या गावातील सुज्ञ नागरिक व तरुणांनी सुद्धा योग्य असे सहकार्य करण्याचे ठरवले आहे. साई ग्रामपंचायत अंतर्गत साई मोहल्ला, खैरवाडी, साई कोंड, बौद्धवाडी, साई गाव या गावातील जनतेने सुद्धा सहकार्य दाखवले आहे. साई ग्रामपंचायतीचे सरपंच हुसेनभाई रहाटविलकर, उपसरपंच प्रकाश धुमाळ व सर्व सभासद, तसेच ग्रामसेवक तेटगुरे हेसुद्धा लोकांमध्ये जनजागृती करत असून गावच्या मुख्य ठिकाणी फलक लावून जागृती करत आहेत. तसेच साई प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे सुद्धा सहकार्य वेळोवेळी मिळत आहे.

साई ही मुख्य बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी बाजारामध्ये जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आजूबाजूला असणाऱ्या गावातील नागरिक मोठया संख्येने येत असतात. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी होत असते. परंतु दोन दिवस अगोदर जनजागृती केल्यामुळे आजूबाजूच्या गावांना सुद्धा संदेश पोहचला असून बाजारपेठ बंद असल्यामुळे घरातून कोणच बाहेर पडत नाही. या घेतलेल्या निर्णयामुळे सर्व ठिकाणी समाधान व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog