ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

धाटावमध्ये राष्ट्रीवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग?

तरुणांनी केली मनसेमध्ये एन्ट्री! 

धाटाव (किरण मोरे) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १४ जून रोजी वाढदिवसाचे औचित साधून धाटाव गावातीलच्या तरुण युवकांनी मनसेमध्ये धडाकेबाज एन्ट्री केल्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला सुरुंग लागल्याचे दिसत आहे. मनसेचा झेंडा हाती घेऊन या तरुण युवकांनी राष्ट्रवादीला मोठा झटका दिल्याचे दिसून येत आहे. यापुढे राज ठाकरे साहेंबाच्या आशिर्वादाने राजकीय वाटचाल निश्चतच त्यांना प्रेरणा देणारी ठरणार आहे.

प्रवेश करणाऱ्या युवकांमध्ये अक्षय रटाटे, दिपक भोगटे, संतोष भोगटे, कुंजन भोगटे, दिपेश जाधव, सुमित फाटक, अक्षय सावंत, जितेश रटाटे, रोहन जाधव, सुरेश मुटके, अक्षय पेटकर, मिकी जाधव, अनिकेत शाल्दुर, विनायक मोरे, प्रफुल चावरेकर, महेश मोहिते, सुमित भिसे, प्रतिक घाग, सिद्धेश तेलंगे, सागर भगत, अजय मुंडे, विनीत कदम, कल्पेश शेळके इत्यादी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

याप्रसंगी मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, दक्षिण जिल्हा संपर्क अध्यक्ष दिलीप सांगले, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रवीण शिंदे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे, रोहा शहर अध्यक्ष मंगेश रवकर, उपशहर अध्यक्ष अमित पवार, विध्यार्थी सेना विकी दिंडे, उप शहर अध्यक्ष महेश साळुंके, महेश वाडकर, सतीश डाकी, रोशन चाफेकर, राकेश लुमान, मनीष ठाकूर, गणेश राऊत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog