मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

सलून व्यावसायिकांना आर्थिक सहाय्य व दुकाने सुरू करण्याबाबत नाभिक समाज संघाचे पालकमंत्र्यांना निवेदन

माणगांव (राहुल कडव) : पालकमंत्री आदिती तटकरे यांना रायगड जिल्हा नाभिक समाज संघ यांनी सलून व्यावसायिकांना आर्थिक सहाय्य व सलून (दुकान) सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी याबाबत निवेदन दिले.

माणगांव नगर पंचायत हद्दीत रस्ते भुमिपूजन कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे माणगांवात आल्या असता रायगड जिल्हा नाभिक समाज संघाचे उपाध्यक्ष मंहेद्र जाधव, 

जिल्हा सदस्य अजित हुजरे यांनी त्यांना निवेदन दिले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे माणगांव तालुका अध्यक्ष  सुभाष केकाने, माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, पचायत समिती सदस्य शैलेश भोनकर, माजी नगराध्यक्ष योगीता चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निलेश थोरे, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, संदीप खरगटे, दिलीप जाधव, नगरसेवक जयंत बोडेरे, नाभिक समाज बांधव  किरण जाधव, निलेश भोसले आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog