रोठ खुर्द ग्रामस्थ मंडळ व मावळा स्वराज्य प्रतिष्ठान तरुणांनी महाडच्या पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात ! 
धाटाव (किरण मोरे) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात मुसळधार पावसामुळे महापुराची परीस्थिती निर्माण झाली होती. या महापुरामुळे महाड शहर व ग्रामीण भाग पुर्णपणे पाण्याखाली गेला. पावसाने विश्रांती घेतल्याने आता पुराचे पाणी ओसरण्यात सुरुवात झाली आहे. तेथील नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दरम्यान, रोठ खुर्द ग्रामस्थ मंडळ व मावळा स्वराज्य प्रतिष्ठाण यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. तसेच युवक श्रेयस मोरे, आशिष मोरे, रोहन मोरे, निशाद पाटील, सागर कोकरे, मयूर मोरे, संकेत राव, जगदीश मोरे, संदेश डाके, अनिकेत मोरे, नयन मोरे साहिल मोरे महेश मोरे सागर माळी, प्रथमेश मोरे, मिरज मोरे, सुरेंद्र मोरे या मंडळींनी महाड तालुक्यात जाऊन साफसफाई व स्वच्छता करण्यासाठी सोबत घमेली, फावडे व इतर अवजारे घेऊन तेथे रस्ते गाव, मंदिर, घरे व परिसर स्वच्छ करण्याच्या मोहिमेला हातभार लावला. संकटाच्या वेळी मदतीला धावून गेलेल्या रोहा तालुक्यातील रोठ खुर्द गावातील सर्व युवकांचे अभिनंदन व कौतुक रोठ खुर्द ग्रामपंचायत मा. सरपंच दिनेश चांगु मोरे यांनी केले.
Comments
Post a Comment