मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨

साई येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा शिवसेनेच्या माध्यमातून संपन्न 

साई/माणगांव (उमैर सोलकर/हरेश मोरे) : माणगांव तालुक्यातील साई प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी 16 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद सदस्या स्वाती नवगणे यांच्या हस्ते पार पडला.

सदरची रुग्णवाहिका जिल्हा परिषदेच्या चौदावा वित्त आयोगाच्या माध्यमातून व्याजाच्या निधीतून घेण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषद सदस्या स्वाती नवगणे यांनी दिली. 

हा लोकार्पण सोहळा शिवसेनेचे माध्यमातून पार पडला. यावेळी शिवसेनेचे माणगांव तालुका अध्यक्ष गजानन अधिकारी, माणगांव तालुका पंचायत समितीचे उपसभापती सुजित शिंदे, तळाशेत ग्रामपंचायत सरपंच रोशनी नवगणे, प्रतीक्षा जाधव, अश्विनी नाक्ते, साई ग्रामपंचायत माजी उपसरपंच अनिस सोलकर, विष्णू भोसले, गफार राहटविलकर, सौद कोंडवीलकर, रहूप करदेकर, प्रशांत अधिकारी, नरेश अधिकारी तसेच साई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप भालके, परिचारिका राऊत, मंचेकर, लिपिक मंगेश ठाकूर, वाहनचालक प्रतिक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog