ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते साई येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न 

साई/माणगांव (हरेश मोरे) : साई प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 16 ऑगस्ट रोजी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी माणगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुभाष केकाणे, पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर, बाबू खानविलर, साई ग्रामपंचायतचे सरपंच हुसेन रहाटविलकर, उपसरपंच प्रकाश धुमाळ, म. हानिफ खेरटकर, रजीया सोलकर, रेश्मा अधिकारी, उमर कोडविलकर, अब्दुल गनी सोलकर, बशीर सोलकर, अब्दुल हामीद राहाटविलकर, अली कोडविलकर, अब्दुला कोडविलकर, सईद दळवी, हारून सोलकर, जावीद आंबेरकर, मतीन जलगावकर, बिलाल जलगावकर, ईलयास जलगावकर, उस्मान चिलवान, ईसतयाक खेरटकर, नासिर सोलकर, रऊफ राहाटविलकर, नविद बेडेकर, अबरार सोलकर, इरफान चिलवान, समीर राहाटविलकर, बळीराम लाड, किसन महाडिक, दिनेश अधिकारी, शिवाजी सावंत, काशीराम मोरे, विठोबा मोरे, प्रविण अधिकारी, मुसा कोडविलकर, गोविंद अधिकारी, सखाराम लाड, मंगेश सुगदरे, तुकाराम अधिकारी, हरीचंद्र अधिकारी, विश्वास अधिकारी, संदेश अधिकारी, अजय अधिकारी,  मनोहर मोहीते, भारत जाधव, गुलाब हिलम व राष्ट्रवादी काँग्रेसचे साई विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमच्या निमित्त पालकमंत्री आदिती तटकरे यांनी कोविड काळात योग्य काम केल्याने साई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आबासाहेब काकडे, डॉ. संदीप भालके तसेच सर्व कर्मचारी यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

या रुग्णवाहिकेचा लाभ साई प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत असणाऱ्या 47 गावे व 64 वाड्यांना तसेच गोवेले, आमडोशी, मोर्बा, पन्हेली, मजगांव, मांजरवणे या सहा उपकेंद्रना होणार असून साई प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असणाऱ्या सुमारे चाळीस हजार लोकसंख्येला होणार आहे.

Comments

Popular posts from this blog