ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा नाका येथे चालकाचे नियंत्रण सुटले, सुदैवाने जीवित हानी टळली!

खारपाडा (सुरेश तांडेल) : मुंबई-गोवा महामार्गावर पेण बाजूकडून पनवेलच्या दिशेने निघालेला ट्रेलर (कंटेनर ) 22 टन माल घेऊन जात असताना खारपाडा ब्रीज क्रॉस झाल्यानंतर या ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्ता सोडून खारपाडा उरण बायपास रोडच्या दिशेने खाली आली. या  ट्रेलरचा नंबर  MH 43 Y 53 94 असा आहे. या गाडी चालकाचे नाव संतोष कुमार रामसोमारो बिंद असे आहे.

सदरची गाडी रोडवरून खाली येत असताना या चालकाने गाडीतून उडी मारून फरार झाला. थोड्या वेळाने तो चालक पुन्हा गाडी जवळ आला. 

उरण खारपाडा बाय पास रोड कडेला दोन महिला मासळी विकायला बसल्या होत्या. जेथे हा ट्रेलर (कंटेनर) आदळणार होणार होता तिथेच या महिला मासळी विकायला बसल्या होत्या. जर हा टेलर (कंटेनर) पलटी झाल असता तर मोठी जीवितहानी झाली असती. सुदैवाने ही जीवितहानी टळली. शिवाय या ट्रेलरचे फारसे नुकसान नाही झाले. 

सदरची घटना पनवेल पोलीस स्टेशन मधे समजता पनवेल पोलीस स्टेशन मधून नितीन डगळे साहेब आणि पोलीस हवलदार म्हात्रे साहेब घटना स्थली हजर झाले आणि या ट्रेलरच्या ड्राइवर कडून मलाकाचा मोबाईल नंबर घेऊन मालकास कॉल करून सर्व घटना मालकास सांगितली आणि ट्रेलर बाहेर काढण्यासाठी क्रेन व हायड्रा वाल्यांना कॉल करण्यास सांगितले. जेणेकरून हा ट्रेलर लवकरात लवकर काढून वाहतूक कशा प्रकारे सुरळीत होईल याबाबत काळाजी घेतली.

Comments

Popular posts from this blog