मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨

माणगांव येथे शिवसेनेच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत व्यक्त केला निषेध 

साई/माणगांव (हरेश मोरे) : माणगांव येथील बस स्थानक समोरील रस्त्यावर माणगांव तालुक्यातील शिवसैनिक यांनी 24 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत निष्ध व्यक्त केला. 23 ऑगस्ट रोजी नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रे दरम्यान महाड या ठिकाणी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गैर वक्तव्य केल्यामुळे माणगांव याठिकाणी शिवसैनिक यांच्या  माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला. 

यावेळी शिवसेनेचे माजी रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी नारायण राणे यांना रायगड जिल्ह्यात फिरून देणार नाही. त्यांना अटक झाली पाहिजे असे वक्तव्य केले. यावेळी निषेध करताना माणगांव तालुका शिवसेना प्रमुख गजानन अधिकारी, माणगांव पंचायत समिती उपसभापती सुजित शिंदे, माणगांव शहर प्रमुख अजित तार्लेकर, मोर्बा विभाग प्रमुख शरीफ हर्गे, इंदापूर विभाग प्रमुख विश्व्म्बर दांडेकर, गोरेगाव शहर प्रमुख प्रदीप गोरेगावकर, इंदापूर उपविभाग प्रमुख विजय जाधव, युवा तालुका प्रमुख कपिल गायकवाड, साई विभाग प्रमुख नरेश अधिकारी, पोटनेर ग्रामपंचायत माजी सरपंच, उपशहर प्रमुख अजिंक्य जाधव, पोटनेर सरपंच बबन काजारे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog