मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

कासारभट ग्रामस्थांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात!

खारपाडा (सुरेश तांडेल) : कासारभट येथील ग्रामस्थांनी महाड तालुक्यातील - वाघेरी, पाणेरी व वारंगी येथील पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला. पण तेथील प्रत्यक्ष स्थिती अशी होती की, गावापासून एक कि.मी. अगोदरचा रस्ता हा तुटला होता. त्यामुळे त्यांच्या वाहनांचा संपर्क सुध्दा तुटला होता. परंतु कासारभट ग्रामस्थांनी एका व्यक्ती मार्फत त्यांच्यापर्यंत मदतीचा संदेश पोहचवला. त्यानंतर अर्ध्या तासात त्या गावांमधून गावकरी येण्यास सुरुवात झाली. जवळ-जवळ १२५ ते १३० गावकरी उपास्थित झाले. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी या पूर परिस्थितीविषयी चर्चा केली. त्यांनी त्यांची व्यथा ग्रामस्थांसमोर मांडली. त्यानंतर समस्त कासारभट ग्रामस्थ मंडळीनी जी मदत गोळा केली होती, ती त्यांना दिली. त्याचबरोबर त्यांनी ग्रामस्थांना विनंती केली की, आमचा भाग हा दुर्गम असल्यामुळे आमच्यापर्यंत फारशी मदत पोहचली नाही. त्यामुळे ते म्हणाले की, आमची ही व्यथा शासनापर्यंत पोहचवा, अशी विनंती केली. जेणे करुन लवकरात लवकर आंम्हास शासना कडून मदत मिळेल. 

तसेच पाणेर या गावातील काशिराम या व्यक्तीने तेथे जवळच असलेल्या किल्ले लिंगानाबद्दल ग्रामस्थांना माहिती दिली व धन्यवाद दिले. सदर मदतकार्यासाठी सुरेश तांडेल, हरिश भोंडकर, करण पाटील, राहूल पाटील, अविनाश भोंडकर, सरोज ठाकूर, अक्षय पाटील, अभिषेक ठाकूर, सिध्देश्वर पाटील, काका पाटील, अक्षय घरत, संतोष म्हात्रे, आशिष गावंड, आकाश गावंड, शुभम पाटील, विश्वास म्हात्रे, बाळकृष्ण ठाकूर आदी ग्रामस्थ महाड - वाघेरी येथे गेले होते. या कार्यासाठी अजित पाटील यांनी ग्रामस्थांना प्रेरीत केले.

Comments

Popular posts from this blog