ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

नवघर गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून खड्डेमय रस्त्याची परिस्थिती सिडको आधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन उपाययोजना करण्याची मागणी

खारपाडा (सुरेश तांडेल) : उरण तालुक्यातील नवघर येथील रायगड भुषण प्रा. एल. बी.पाटील यांनी गणपती सण जवळ येऊन देखील नवघर एस.टी.स्टॅंड ते नवघर गावापर्यंत तसेच नवघर, नवघरपाड्यापासून भेंडखळकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याबाबत बोलावलेल्या नवघर गावातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे सोमवार दि. २३ ऑगस्ट रोजी ठिक ११-३० वाजता द्रोणागिरी सिडको आ‌ॅफीस बोकडवीरा, उरण येथे नवघर गावाच्या आजूबाजूच्या रस्त्यांची खड्डेमय परिस्थिती सिडको अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून देऊन योग्य तो निर्णय घेण्यास भाग पाडू असे नवघर गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये ठरवल्याप्रमाणे नवघर गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते सिडको आ‌ॅफीस द्रोणागिरी नोड बोकडवीरा येथे जाऊन संबधीत सिडको अधिकाऱ्यांसोबत चर्चा विनिमय करून सिडकोचे वरिष्ठ अधिकारी एच. डी. नहाने यांच्याशी फोनवर सविस्तर खड्डेमय रस्त्यांची परिस्थिती सांगितली. 

त्यावेळी तात्काळ सिडकोचे अधिकारी इंजिनिअर श्री. जयेश तांडेल यांना घेऊन सदर खड्डेमय रस्त्यांची पाहणी करून त्यावर योग्य ती उपाययोजना म्हणून तात्पुरते का होईना पण गणपती सणाआगोदर म्हणजे २५ आ‌ॅगस्ट २०२१ पासून ते १ सप्टेंबर २०२१ पर्यंत संपुर्ण नवघर एस.टी.स्टॅंड ते नवघर गावापर्यंत तसेच नवघर, नवघरपाडा ते भेंडखळ गावाकडे जाणाऱ्या तसेच या गावांच्या आजूबाजूला असणारे खड्डे बुजवण्याचे कबूल करून पावसाळ्यानंतर या रस्त्यांसंबधी कायमस्वरूपी योग्य तो ठोस निर्णय घेऊ असे संबधीत सिडको अधिकाऱ्यांनी नवघर गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सांगितले असता सदर सिडको अधिकाऱ्यांचे ग्रामस्थांनी आभार मानून धन्यवाद दिले. यावेळी नवघर गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. 

भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष श्री. जयप्रकाश मधुकर भोईर, शिवसेना शाखा प्रमुख श्री अविनाश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य श्री. गणेश रमाकांत वाजेकर, ग्रामस्थ मंडळ नवघरचे माजी अध्यक्ष श्री योगेश सुरेश तांडेल, ग्रामस्थ मंडळ नवघरचे खजिनदार श्री. ज्ञानेश्वर मधुकर भोईर, शेकापचे माजी उपसरपंच श्री. विश्वास बळीराम तांडेल आणि ज्येष्ठ पत्रकार मनोहर धनाजी भोईर आदि मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog