मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

प्रतिक वाघमारे यांचे दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस व सम्यक सामाजिक संस्थेकडून अभिनंदन 

बेणसे (चंद्रकांत अडसुळे) : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील प्रतिक अरविंद वाघमारे याने आपल्या इच्छा शक्तिच्या बळावर एम.पी.एस.सी. ची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा वर्ग 'अ' ची परिक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता या पहिल्या श्रेणीच्या पदावर नियुक्ती मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे. या परिक्षेला महाराष्ट्रातील एकूण एकवीस जण उत्तीर्ण झाले. प्रतिक वाघमारे हा मागासवर्गीय प्रवर्गातून सहा जिल्ह्यात म्हणजे कोकणातून एकमेव विद्यार्थी आहे. त्यामुळे त्याच्या या यशाबद्दल नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस (महाराष्ट्र) व सम्यक कला क्रिडा शैक्षणिक व सामाजिक संस्था बेणसे, ता.पेण, जि.रायगड, रजि. महाराष्ट्र च्या वतीने त्याचे खूप-खूप अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सम्यकचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पांडुरंग अडसुळे, सचिव प्रमोद दयानंद काकडे, बेणसे ग्रामपंचायत उपसरपंच संतोष पांडुरंग अडसुळे, आदिनाथ अडसुळे, अमित अडसुळे, विशाल अभंगे, विजय अडसुळे, ज्ञानेश्वर कोळी, प्रमोद शेलार, प्रदीप पवार, आंबेघर ग्रामपंचात सदस्य शैलेश शेलार, बचतगटाच्या अध्यक्षा कांचन अडसुळे कविता संतोष अडसुळे, पुजा अडसुळे, सुगंधा काकडे आदि मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog